आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरलेल्या एटीएमने खरेदी, सीसीटीव्हीत कैद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - लकी चौकातील एचडीएफसी एटीएम सेंटरमधून एका ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड चोरून एका कापड दुकानात कपडे आणि आपटे ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करताना दोन तरुणांची छबी सीसीटीव्हीच्या चित्रफितीत कैद झाली आहे.

एटीएम सेंटर आणि आपटे ज्वेलर्समधील चित्रफितीतले चेहरे एकच आहेत. यावरून ही चित्रफीत पोलिसांनी प्रसिध्दीस दिली आहे. दोन तरुणांवर संशयित म्हणून नजर ठेवली आहे. हे तरुण आपल्याला माहिती असल्यास गुन्हे शाखेत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समाधान चव्हाण (रा. डिकसळ, मोहोळ) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजून दहा मिनिटांनी ही घटना घडली आहे. २८ तारखेला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपासात या घटनेची चित्रफीत तपासाला घेतली आहे.

चव्हाण हे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर दोन तरुणांनी त्यांची नजर चुकवून कोड नंबर विचारत २५ हजार रुपये त्यातून काढून घेतले. त्यांना बनावट कार्ड दिले. त्यानंतर दोघांनी कपडे सोने ऑनलाइनद्वारे खरेदी केली. २८ मिनिटांत सोने, कपडे खरेदी केले आहेत.