आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केसाने गळा कापणारे आम्ही नाही: परिचारक, कचरेवाडीतील युटोपियन कारखान्यावर घेतला मेळावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- जनतेनेपरिचारक घराण्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्याला छेद देऊन केसाने गळा कापण्याचे काम आमच्या हातून कधीही होणार नाही. सर्वसामान्य जनता ही आपले कुटुंब समजून सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी केले.
कचरेवाडी (ता. मंगळवेढा) येथील युटोपियन कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत परिचारक बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण आरोग्य समितीचे सभापती शिवानंद पाटील होते. या वेळी दामाजी कारखान्याचे माजी अध्यक्ष चरणू पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव देशमुख, युन्नूसभाई शेख, महादेव भोजने, दत्ता भाकरे, होनापुरे महाराज, अशोक केदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. परिचारक म्हणाले, आजपर्यंत विरोधकांनी फक्त पाण्याचे राजकारण करून जनतेची दिशाभूल केली आहे. त्यांना विकासाचे काहीही देणे-घेणे नाही. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्याबरोबर आपली पहिली बैठक ज्या वेळी झाली त्या वेळी त्यांनी आपणाला सांगितले की, पंढरपूर-मंगळवेढ्याचा आमदार हा रिडालोसमधून निवडून आला. त्यावेळी आम्ही त्याला मदत केली. परंतु निवडून आल्यावर स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी या संधीसाधूने वेगळी वाट धरली. आता अशा मंडळींना पाणी पाजण्याची हीच वेळ आली आहे. त्यामुळे महायुतीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी आम्ही तुम्हाला दिली असल्याचे सांगितले. औदुंबर वाडदेकर यांनी प्रास्ताविक केले. हौसाप्पा शेवडे यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी शिवाजी नागणे, बाबासाहेब पाटील, दाजी पाटील, अरुण किल्लेदार, सिद्धू सावकर, भारत बेंद्रे, सुरेश आगावणे, हरिष गायकवाड, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, नंदकुमार हावनाळे, दिलीप चव्हाण, नामदेव जानकर, बसू पाटील, हरिभाऊ चव्हाण, चंदू खांडेकर, महादेव लुगडे, रामभाऊ माळी, सुभाष पाटील, दुर्योधन इंगोले, संभा लवटे, कुमार धनवे आदी उपस्थित होते. मंगळवेढा येथील युटोपियन कारखान्यावरील मेळाव्यात बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत परिचारक. छाया: विलास साळुंखे, पंढरपूर