आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uttar Pradesh Chief Minister Akhilesh Yadav's Leopard Coming Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मुलांंचा लाडका बिबट्या येणार सोलापूरकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या मुलांंचा लाडका बिबट्या जिम्मीसह चार बिबटे लखनऊहून सोलापूरकडे मार्गस्थ झाले आहेत. बुधवारी रात्री ते कानपूर मुक्कामी होते. चार दिवसांत ते सोलापूरच्या महात्मा गांधी राष्ट्रीय प्राणी संग्रहालयात पोहोचतील.लखनऊ येथील राष्ट्रीय प्राणी संग्रहालयातून हे बिबटे सोलापुरात आणले जात आहेत. महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज रापतवार यांच्या नेतृत्वाखाली पथक या कामी आहे. चार बिबट्यांपैकी एक बिबट्या अखिलेश यादव यांच्या मुलांचा आवडता होता. प्राणी संग्रहालयाच्या जवळच यादव यांचे घर आहे. त्यांची मुले प्राणी संग्रहालयात येऊन जिम्मीचे लाड करत होती. केंद्रीय वन्यजीव खात्याने मंजुरी दिल्यानंतर त्यांना सोलापूरच्या प्राणी संग्रहालयाकडे रवाना करण्यात आले.

आरोग्याची काळजी
महापालिकेचेपथक बुधवारी रात्री कानपूरपर्यंत पोहोचले. उत्तर भारतात थंडीचा कडाका आहे. ठरावीक तासानंतर बिबट्यांच्या आरोग्याची तपासणी करून काळजी घेतली जात आहे, असे डॉ. रापतवार यांनी सांगितले.

'तो' बिबट्या परत दिला
लखनऊयेथील केंद्रीय पथकाने महापालिकेच्या पथकाकडे एक शेपूट तुटलेला बिबट्या सोपवला होता. याबाबत काळजी वाटल्याने पथकाने महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना माहिती दिली. गुडेवार यांनी वन अधिका-यांना तो बदलून देण्याची मागणी केली आणि वनअधिका-यांनी ती मान्य केली.