आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttarakhand Flood Affect Tourism Business Solapur

पर्यटन व्यवसायावर कोसळली आपत्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उत्तराखंडमध्ये पावसाने घातलेल्या थैमानानंतर सोलापूरकरांनी तिकडे जाण्याचे बेत रद्द केला आहे. त्यामुळे टूर कंपन्यांना सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त रकमेचा फटका सहज बसण्याची शक्यता आहे.

जून, जुलैत उत्तराखंडमध्ये जाण्याचे नियोजन काही सोलापूरकरांनी केले होते. चडचणकर ट्रॅव्हल्सची 5 ते 30 सप्टेंबर दरम्यान उत्तराखंडची टूर निघणार होती. यासाठी आतापर्यंत 20 पर्यटकांनी आपले बुकिंग केले होते. मात्र, टूर रद्द करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या सहलीत नैनिताल, डेहराडून, हरिद्वार आदी पर्यटनस्थळांचा समावेश आहे. सध्या याच ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. दूरचित्रवाहिनीवरून याची भयानकता पाहिली आहे.

चडचणकर ट्रॅव्हल्सच्या वतीने या कालावधीत पाच गाड्या उत्तराखंडसाठी रवाना होतात. एका गाडीत 50 प्रवासी असतात. त्यासाठी एका प्रवाशाकडून 21 हजार 500 रुपयांचा दर आकारण्यात येतो. एक गाडी कॅन्सल झाली तर 10 ते 12 लाखांचा फटका बसतो. 5 गाड्यांचा विचार करता 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तसेच अशीच परिस्थिती चौधरी टूर्स कंपनीची आहे. ‘चौधरी’च्या वतीने 20 जूनपासून उत्तराखंडची यात्रा सुरू होणार होती. त्यासाठी सोलापूरसहित 30 प्रवाशांची नोंदणी करण्यात आली होती. तीदेखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे याचाही कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

अमरनाथ यात्रेवर परिणाम
पर्यटक पहाडी परिसराकडे पाठ करतील हे निश्चित मानले जात आहे. पुढील महिन्यात येत असलेल्या अमरनाथ यात्रेवरदेखील याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. सोलापुरातून दरवर्षी दोनशे ते तीनशे यात्रेकरू अमरनाथ यात्रेला जातात. यंदा त्यांची संख्या घटेल.

पर्यटक नाहीत; सहली रद्द
सप्टेबरमध्ये नियोजित असलेली उत्तराखंडची टूर रद्द करावी लागत आहे. दरवर्षी पाच गाड्या जातात. एक गाडी रद्द झाल्यास 10 ते 12 लाखांचा फटका आहे. गाड्या रद्द झाल्यास 50-60 लाखांचा फटका आहे.’’ मृगेंद्र चडचणकर, चडचणकर टुर्स अँन्ड ट्रॅव्हल्सचे मालक

सुमारे एक कोटीचा फटका
जुलैमधील ट्रीप सुमारे 30 लोकांनी रद्द केली आहे. सप्टेंबरमधील ट्रीपचे भवितव्य अंधारात आहे. यामुळे कंपनीला एक कोटीचा फटका बसला आहे.’’ सत्यनारायण चौधरी, संचालक, चौधरी यात्रा कंपनी