आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uttrakhand Flood Affected People Help Rally Solapur

उत्तराखंडच्या मदतीसाठी रोटरीची रॅली; ‘जीवनज्योती’कडून होम-हवन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - उत्तराखंड येथील नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या स्थितीत मदत करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूरने शहराच्या प्रमुख मार्गांवरून निधी संकलन रॅली काढली. दुपारी साडेतीन वाजता पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांच्याहस्ते रंगभवन चौकातील मेसॉनिक हॉलजवळ झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.

संकलन केंद्रे
शहरातील व्हीआयपी रस्त्यावरील मोंढे अँटोमोबाईल्स्, जोडबसवण्णा चौकातील मार्कंडेय कॉम्प्युटर्स, पार्क चौकातील प्लॅनेट फॅशन, स्मृती इंजिनिअरिंग वर्क्‍स, मार्केट यार्डजवळील परफेक्ट मशिनरी या ठिकाणी निधी संकलन केंद्रे सुरू केली आहेत.

रोटरीचे दीड लाख
रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वतीने दीड लाख रुपये देण्यात आले. पदयात्रा आणि निधी संकलन केंद्र यातून जमा झालेल्या निधीसोबत ही रक्कम पाठवणार असल्याचे डॉ. व्यंकटेश मेतन यांनी सांगितले. या पदयात्रेत रोटरी सदस्य रस्त्यावर निधी गोळा करत होते. प्रत्येकाने किमान 100 रुपये द्यावे, अशी विनवणी रोटेरिअन्स् करत होते. शिवाय हजारांच्या पुढे रक्कम देणार्‍यास आयकरातून सूट असणारी पावती देण्यात येत होती.