आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • V V P Engineering College, Latest News In Divya Marathi

100 ‘रँचों’कडून भन्नाट कल्पनाविष्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोरेगाव येथील विद्या विकास प्रतिष्ठानच्या व्हीव्हीपी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय प्रोजेक्ट, पेपर प्रेझेंटेशन आणि इतर टेक्निकल इव्हेंट्समध्ये 1100 रँचोंनी आपला आविष्कार सादर केला. यात रोबो रेस, ऊर्जा बचत, निसर्ग संवर्धन, पोस्टर प्रदर्शन, गेमिंग आणि सर्किट वॉर अशा अनेक भन्नाट कल्पना सादर झाल्या.
‘विझोटेक’चे उद्घाटन फोर्बस मार्शलचे रघू नायर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे इवा सोल्युशन प्रा. लि.च्या आदिती पटेल, प्राचार्य एस. व्ही. देशपांडे, एस. एन. कुलकर्णी यांची उपस्थिती होती. प्रदर्शनात आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यामाध्यमातून विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ मिळाल्याचे प्रा. जी. के. देशमुख यांनी सांगितले.
प्रमुख आकर्षण
शेतकर्‍यांना उपयुक्त- कांदा काढण्यासाठी खूप वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे यंत्राद्वारे हे काम व्यवस्थित करता येते. वैभव वाळके, (कर्मयोगी अभियांत्रिकी)
रोबो रेसमध्ये उत्कंठा व थरार
रोबो रेसमध्ये एकूण 40 रोबोंनी सहभाग घेतला होता. यामध्ये अवघड रस्ता पार करून जाण्याची शर्यत लावण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आविष्कार या वेळी दाखवला. यामध्ये तीन फेरी होत्या. अंतिम फेरीतील रोबोला उत्कृष्ट रोबोचे पारितोषिक मिळेल, असे स्पध्रेचे समन्वयक रोहित जाधव यांनी सांगितले.
अभियांत्रिकी शिक्षणामध्ये संशोधनाचे कौशल्य आत्मसात करावे. अभियंते आणि संशोधन याचे नाते अतूट असून प्रत्येक अभियंता वेगवेगळे संशोधन करण्यासाठी प्रयत्नशील असावा, असे मत रघू नायक यांनी व्यक्त केले.