आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - प्रेम कर भिल्लासारखं. बाणावरती खोचलेलं.. मातीत उगवूनसुद्धा.. मेघापर्यंत पोहोचलेलं..अशा चारोळ्या, आठ ओळ्या हुडकून तुम्ही आपले प्रेम या व्हॅलेंटाइन निमित्त व्यक्त करणार असाल तर जरा थांबा. या व्हॅलेंटाइनला दुसर्याच्या कविता लिहिलेले कार्ड देण्यापेक्षा तुमच्या भावना व्यक्त करणारे एखादे छानसे प्रतीक जास्त प्रभावी ठरू शकेल.
प्रेमाला कोणतीही उपमा देता येणार नाही, हे जितके सत्य आहे, तितकेच प्रेम व्यक्त करण्यासाठीची प्रतीकेही आवश्यक आहेत, हेही तितकेच सत्य आहे. तुम्ही म्हणाल, प्रेम व्यक्त करणे महत्त्वाचे. कोणत्या प्रतीकांच्या माध्यमातून ते व्यक्त करता ते महत्त्वाचे नाही. बरोबर आहे, कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही बाजारी गोष्टीची गरज नसते, त्यातील प्रेमाची भावना सर्वांत महत्त्वाची असते. अर्थात त्यांचा विचार करूनच अनेकविध प्रतीकांची निर्मिती करण्यात आली आहे. पार्क चौकातील आर्चिज गॅलरीसह अनेकविध ठिकाणी ते उपलब्ध आहेत. व्हॅलेंटाइन डे निमित्त सध्या ही दालने गजबजली आहेत. म्हणून गहिरं असो वा अधुरे, या प्रेमातील अनेकविध छटा व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेकविध प्रेमप्रतीकांनी सध्या बाजारपेठ सजली आहे.
आठ आण्याच्या पोस्ट कार्डावर दोन ओळी खरडल्या तरी प्रेम व्यक्त करता येते, असे म्हणणार्या प्रेमवीरांनो, 800 रुपयांचे तीन फूट उंचीचे आर्चिजचे शुभेच्छा भेटकार्ड पाहा. मग पाहा प्रेम कसे शोभीवंतपणे व्यक्त होते ते.
आता वाटेल की प्रेम व्यक्त करणेही महागडे होतेय की काय ? तसे मुळीच नाही. केवळ सात रुपयांपासून विविध प्रतीके उपलब्ध आहेत. लव्ह चॉकलेट्सही मिळतात. त्याशिवाय हार्ट रोझ चॉकलेट हा नवीन प्रकार केवळ 70 रुपयांना मिळू शकतो. हृदयाच्या आकारातील प्रतीके भेट देण्यासाठी सर्वांत प्रभावी प्रकार आहे. तुमचे हृदय अनमोल तर आहेच, शिवाय ज्यांना ते अर्पण केलेय तेही तुमच्यासाठी तितकेच अनमोल असतील. म्हणूनच हृदयाच्या भावना व्यक्त करणार्या या प्रतिकांची किंमत विचारली जाऊ नये. तरीही सांगतो, हार्टचे प्रतीक 10 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत मिळते.
धडधडणार्या म्युझिकल हार्टस्चे आकर्षण
आवडत्या व्यक्तीला टेडी बेअर भेट म्हणून देणे, हा प्रेम व्यक्त होण्याचा सर्वांत गुलाबी मार्ग. यासाठी 70 रुपयांपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंतचे टेडीबेअर व्हॅलेंटाइन डे निमित्त उपलब्ध आहेत. पर्ल सेट केवळ 200 रुपयांना मिळू शकते. याशिवाय आकर्षक गुलाबही उपलब्ध आहेत. प्रेम व्यक्त करताना जसे हृदय धडधडते, अगदी तसेच धडधडणारे म्युझिकल हार्ट केवळ 70 रुपयांना उपलब्ध आहे. लव्ह कोट्स असणारे 365 दिवसांचे कॅलेंडर सर्वांत प्रभावी असे प्रतीक आहे, त्याशिवाय लव्ह मग, म्युझिकल मग मिळू शकते.
पसंत बदलतीय.
शुभेच्छा पत्रांपेक्षा विविध प्रतीके, टेडीबेअर देऊन विश करणे रूढ झाले आहे. अगदी सात रुपयांपासून ते साडेतीन हजार रुपयांपर्यंतची ही प्रतीके तरुणाईला विशेष पसंत पडत आहेत.’’
सोनाली मस्के, संचालिका, आर्चिज गॅलरी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.