आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमीजनांत व्हॅलेंटाइन वीकची उत्सुकता, उद्यापासून प्रेमोत्सव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- व्हॅलेंटाइनवीक जवळ आलाय आणि त्यासाठी अवघे प्रेमीजन उत्सुक झालेत. सोलापुरातही याची जोरदार तयारी सुरू आहे. कोणत्या दिवशी इव्हेंट करायचा याची जमकर तयारीही आहे. तुम्ही प्रेमात पडलेले असाल आणि हा व्हॅलेंटाइन वीक साजरा करण्याचे ठरवले असेल तर तुम्हाला किमान हजार रुपये खर्च येईल. तुम्ही म्हणाल दिवस किती रोमँटिक आणि बातमी किती बोअर.

खर्चाच्यातागड्यात कोणी आपले खरे प्रेम जोखते का?
खिशातले पाकीट नेहमी रिकामे, म्हणून निस्सिम प्रेम आटते का ?

हे कवितेत जरी ठीक असले तरी व्यवहारात प्रेमाचे नाणे वाजवावेच लागते. म्हणून या व्हॅलेंटाइन डे ला केवळ नेट पॅक मारून व्हॉट्सअॅपवर शुभेच्छा देऊन भागणार नाही. कंजूषपणाचा शिक्का वर्षभर कितीही खर्च केला तरी जाणार नाही. केवळ व्हॅलेंटाइन डे दिवशी विश करूया, असे म्हणूनही भागणार नाही. कारण, जगभरातील विविध देशांमध्ये फेब्रुवारीपासून विविध डे साजरे करण्याची फॅशन भारतातही आलीय. भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणा-या काहींनी १४ फेब्रुवारी हा दिवस माता-पिता पूजन दिवस म्हणून साजरा करावा अशी शिफारस केली. त्याचा किती प्रभाव पडेल, हेही लवकरच दिसून येईल.
पुढे वाचा प्रेमोत्सवाबद्दल