आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रोझ डे’ने व्हॅलेंटाइनचे काउंटडाउन सुरू...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अंतरीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी ओळखला जाणारा दिवस जवळ आला आहे. व्हॅलेंटाइन विक अर्थात जागतिक प्रेम सप्ताहाला गुरुवारी सुरुवात होत आहे. शहरातील प्रेमवेडी तरुणाई या दिवसांची आतुरतेने वाट पाहते. प्रेमवीरांच्या इच्छापूर्तीसाठी शहरात विविध प्रकारच्या गिफ्टची दुकाने नटली आहेत.

रोममधील व्हॅलेंटाइन नामक एक पुजारी इसवी सनपूर्व 270 च्या काळात प्रेमविवाहाला प्रोत्साहन दित होते. त्यांच्या स्मरणार्थ 14 व्या शतकापासून व्हॅलेंटाइन डे व सप्ताह साजरा करण्याची प्रथा पडल्याचे मानले जाते. यामध्ये प्रपोज डे, टेडी डे, चॉकलेट डे, प्रामीस डे आदींचा समावेश होतो.

चांगला प्रतिसाद
"मागील अनेक वर्षांपासून तरुणाईची गरज पाहता आम्ही हा व्यवसाय थाटला. एरवी तर केकपेस्ट्री व लहान-मोठे गिफ्ट, बुकेसाठी गर्दी असते. पण, व्हॅलेंटाइन हा तरुणाईच्या दिल की धडकन असणारा उत्सव आहे. त्यानिमित्त बाजारात विविध प्रकारचे आयटम्स् आलेले आहेत. प्रतिसाद चांगला आहे.’’ -दत्तात्रय झिंजुर्डे, डॅनिश केक अँण्ड फ्लॉवर शॉप, पार्क

प्रेम व्यक्त करावेच
"प्रेम व्यक्त करण्यासाठी ठरावीक दिवस असू नये असे म्हटले जाते, ते काही प्रमाणात खरे आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करू नये असेही म्हटले जाते. व्हॅलेंटाइन डे सारख्या प्रथांचे अनुकरण करण्यात काहीच नुकसान नाही असे वाटते. प्रेमासाठी एक हक्काचा दिवस याकडे पाहिले पाहिजे.’’
-सारिका शेळके, सोलापूर

असे आहेत फुलांचे दर
लांब देठ र्जमन रोझ : 15 रुपये 1 नग
रोझ बुके : 100 ते 125 (आकारानुसार)
स्पेशल रोझ बुके : 300 च्यापुढे
भेटकार्ड : 10 रुपयांपासून पुढे

तरुणाईच्या प्रेमासाठी हक्काचा दिवस

पहिल्या दिवशी ‘रोझ डे’
जर आधीच कोणी आपले प्रेम व्यक्त केले असेल तर त्याने यादिवशी आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला गुलाबाचे फुल देऊन पुन्हा एकदा ते प्रकट करावे. हे कायम राहण्याचे वचन घ्यावे व द्यावे. पिवळ्या, पांढर्‍या, लाल किंवा गुलाबी रंगाच्या गुलाबाचा शक्यतो वापर करावा.

जागतिक प्रेम सप्ताह
प्रेम व्यक्त करण्यासाठीचे सात दिवस, आजपासून प्रेमवीर लागणार कामाला, शहरात सजली विविध प्रकारच्या भेटवस्तूंची दुकाने, गिफ्ट खरेदीसाठी होतेय गर्दी