आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढतोय फिव्हर ‘व्हॅलेंटाइन डे’चा, हजारांचा टेडी तर 1200 चे चॉकलेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी तरुणाई आता कामाला लागली आहे. व्हॅलेंटाइन विकची सुरुवात झाली अन् तरुणाईला आनंदाची पर्वणीच मिळाली. बाजारपेठेत यासाठी बरेच साहित्य आलेले आहे. यात डान्सिंग टेडी, म्युझिकल टेडी, चॉकलेटचे विविध प्रकार आहेत.

आर्चिस गॅलरी, मार्वल ग्रिटिंग गिफ्ट शॉप, सहेली कार्ड सेंटर यासह अन्य गिफ्ट शॉपींमध्ये व्हॅलेंटाइनची धूम आहे. इंचाच्या कार्डपासून दीड फूट तर बोटाएवढ्या टेडीपासून अडीच फुटांचे टेडीबेअर विक्रस आहेत. थर्मोकोलचे हार्ट, पेपर हार्ट, प्लास्टिक कोटेड कपल टेडी, आकर्षक गिफ्ट पॅक केलेले चॉकलेटस यांचा यात समावेश आहे.
हे आहेत प्रकार
सिंगींगटेडी, स्पाँजी टेडी, एलईडी लाइटचा टेडी, ह्यूज लव्ह कार्ड, थर्मो हार्ट, फ्लॉवर्स बुके, आय लव यू बी माइन असा लाइटने संदेश देणारा टेडी, कपल टेडी, बॉक्स पॅकिंगचा टेडी.
टेडी ३० रुपयांपासून हजारांपर्यंत
अवघ्या३० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत टेडी विक्रीला आलेले आहेत. यात आय लव यू असे म्हणणारा टेडी सर्वांचे अाकर्षण ठरत आहे. नाचणाऱ्या टेडीलाही तितकीच मागणी आहे. हा टेडी ९०० रुपयांपासून दीड हजारांपर्यंत आहे.

जर्मन रोझला मागणी-
आपल्याबागेतील गुलाबापेक्षा या दिवशी जर्मन रोझला मागणी असते. २० रुपयांना एक तर गुच्छच्या किमती गुलाबांची संख्या आकर्षकता यावर आहे. २५ हजार नग हा गुलाब येईल. किरणझिंजुर्डे, गिफ्ट बुके फ्लावर विक्रेते