आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Valentine's Day' Destructive Culture Of The Day Said Hindu Janjagaran Samiti

‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे संस्कृती विध्वंसक दिन- हिंदू जनजागृती समिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे भारतीय संस्कृती विध्वंसक दिवस आहे. तो साजरा करण्यावर प्रतिबंध घालण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी शंकर जाधव यांना देऊन निदर्शने करण्यात आली.

दरवर्षी 14 फेब्रुवारीला हा दिवस साजरा होतो. शाळा, महाविद्यालये, पर्यटनस्थळे आदी ठिकाणी ही प्रथा वाढली. विदेशी कंपन्या भेट वस्तू खपवण्यासाठी त्याला प्रोत्साहन देत आहेत. ‘व्हॅलेंटाइन डे’मुळे युवा वर्गावर, त्यांच्या मानसिकतेवर मोठय़ा प्रमाणावर परिणाम होतो. असे दिवस साजरे केरून अनैतिकतेचा प्रसार करत आहेत. त्याची दखल घेऊन हा दिवस साजरा करण्यावर प्रतिबंध घालावा, असे निवेदनात म्हटले आहे.

या वेळी माजी नगरसेवक बापू ढगे, केसरी प्रतिष्ठानचे केदार पुजारी, योग वेदांत समितीचे रमेश कुलकर्णी, योगिराज हरसुरे, आजोबा गणपती ट्रस्टचे गंगाधर गवसणे, राजेश पुकाळे, प्रवीण गुज्जर, परशुराम इंचगे, व्यंकटेश मादगुंडी, सनातन संस्थेच्या लतिका पैलवान, हिरालाल तिवारी, र्शीदेवी पाटील, रमेश आवार, सत्यनारायण कनकी, र्शीनिवास गोपनपल्ली आदी उपस्थित होते.

पाश्चात्य संस्कृती परतवून लावा
पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे भारतीय संस्कृती बिघडत आहे. अशा प्रथेमुळे तरुणाई वाईट मार्गाला लागत आहे, भरकटत आहे. त्याची दखल घेऊन छत्तीसगड शासनाने ‘व्हॅलेंटाइन डे’वर बंदी घातली. त्याच दिवशी ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ सुरू केले. महाराष्ट्र शासनाने त्याचा विचार करून असे दिवस साजरे करण्यावर प्रतिबंध घालावा. विद्या कुलकर्णी, सदस्या, रणरागिणी शाखा

व्हॅलेंटाइन कुठय?
मलेशियाने ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्याचे थांबवले आहे. रोमन कॅथलिक चर्चनेही संत व्हॅलेंटाइन नावाच्या कोणत्याही व्यक्तीविषयी सबळ पुरावे नाहीत म्हणून दिनदर्शिकेतून हा ‘डे’ वगळला. केवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांसाठी या दिवसाचा गाजावाजा केला जातो. त्याला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे भारतीय संस्कृतीवर आघात आहे. तो दिवस साजरा करू नये, तर तो दिवस घालण्याचे प्रयत्न करावेत. त्यासाठी संस्था, संघटनांनी पुढाकार घेऊन हा दिवस साजरा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याबाबत जनजागृती करावी. रार्जशी तिवारी, सदस्या, हिंदू जनजागृती समिती