आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिघांना पोलिस तर एकवीस जणांना न्यायालयीन कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ग्रामीण पोलिसांनी टाकळी परिसरात टाकलेल्या छाप्यातील अटक केलेल्या तिघांना शनिवारी न्यायदंडाधिकारी एस. एस. पानसरे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
अन्य एकवीस जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. हरिष उर्फ राजू गणेश गौडा (वय ३५, रा. पुनाल, पुत्तूर), श्रीधरा राम बलचंदपारा (३८, रा. पुनाल पुत्तूर), मल्लिकार्जुन बिराजदार (वय २३, रा. टाकळी) या तिघांना पोलिस कोठडी मिळाली आहे. कारखाना चालविणारे अन्य तिघेजण गायब आहेत. सरकारतर्फे के. यू. चिंचवले, आरोपीतर्फे एस. आर. देशपांडे, एल. व्ही. मारडकर, नागेश खिचडे, विक्रांत फताटे हे वकील काम पाहत आहेत.

काडादी घरातील चोरी, तिघांना पोलिस कोठडी
डफरीन चौकात काडादींच्या बंगल्यातून साडेआठ तोळे दागिने चोरीस गेल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित चोरासह तिघांना शनिवारी एक़ दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. सराफ व्यापारी अनिल विजयकुमार शहा (रा. सोलापूर) यांच्यासह मुख्य संशयित चोरटा अनिल डुकरे, त्याचा भाऊ गणेश डुकरे (रा. दोघे देगाव रोड) यांना पोलिस कोठडी मिळाली आहे. अनिल हा काडादींच्या घरी वर्षापूर्वी प्लंबगीचे काम करण्यासाठी आला होता. त्यावेळी चोरी केली. त्यापैकी काही दागिने गणेश याने ज्वेलर्स व्यापारी शहा यांना विकले होते. तपासात ही बाब निष्पन झाल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अण्णाराव काडादी यांनी शुक्रवारी फिर्याद दिली आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत बोध, हवालदार कैलास कांबळे, लक्ष्मण खरात, पैंगबर शेख,झेड. एम. शोख, उध्दव घोडके, दीपपक डोके यांनी केली आहे.

पोलिसाच्या घरातून आठ तोळे दागिने चोरीला
विजापूररोडवरील सैफुल परिसरातील गुरूकृपा अपार्टमेंट येथे राहणारे गुरूबसू सिद्रय्या कायपूूरे यांच्या घरात चोरी झाली. ही घटना शनिवारी दुपारी दोनला उघडकीस आली. धर्मराज बिराजदार (रा. सैफुल) यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री कायपुरे हे परिवारासह श्रीशैल येथे दर्शनसाठी गेले होते. आज त्यांचे घर फोडल्याचे लक्षात आले. त्यांचे भावजी धर्मराज यांनी फिर्याद दिली आहे. चार तोळे गंठण, दोन तोळे लक्ष्मीहार, एक तोळे अंगठी, अर्धा तोळे अंग़ठी, झुमके, नऊ हजार रुपये रोख असा ऐवज चोरीस गेला आहे. कायपुरे हे पोलिस म्हणून कार्यरत असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक एन. बी. अंकुशकर यांनी घराची पाहणी करून माहिती घेतली. कडीकोयंडा उचकटून कपाटातील दागिने नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तिघांना पळवून नेले
शिवाजीनगर बाळे येथून तिघांना चौघांनी मिळून कारमधून पळवून नेले. ही घटना शुक्रवारी रात्री सहाच्या सुमाराला घडली. अरुणा कन्हैय्या बोई (रा. रायचूर, सध्या बाळे) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. कन्हैय्या बोई, गणेश पद्दशाली, शिवा पद्यशाली यांना पळवून नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कारण अद्याप स्पष्ट नाही. चौघा जणांवर फिर्याद देण्यात आली आहे. चौघेजण कारमधून आले होते. त्यांनी घरातून तिघांना पळवून नेले.
बातम्या आणखी आहेत...