आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varkari In Queue Will Get Medical Facilities At Pandharpur

दर्शनरांगेतील वारकऱ्यांना मोफत चहा, वैद्यकीय सुविधा मिळणार !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - यंदाच्या आषाढी यात्रेचे संपूर्ण नियोजन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे करत आहेत. वारकऱ्यांना मंदिर समिती व जिल्हा प्रशासनाचा अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून दर्शनमंडप व दर्शनरांगेतील भाविकांना मोफत चहा, पाणी देण्यात येणार अाहे. शिवाय आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठीचा खर्च मंदिर समिती करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मुंढे यांनी दिली.

सरकारने मंदिर समिती बरखास्त केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची मंदिर प्रशासनाच्या अध्यक्षपदी निवड केली. यामुळे संपूर्ण आषाढी सोहळ्याचे नियोजन जिल्हाधिकारी करत अाहेत. शनिवारी (दि. २७) केलेल्या पाहणीनंतर जिल्हाधिकारी मुंढे यांनी मंगळवारी (दि. ३०) संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.
१.१० कोटी अखर्चित
आषाढी वारीनिमित्त पालख्या मुक्कामांच्या गावांना २०१४-१५ या आर्थिक वर्षात एक कोटी १० लाख रुपयांचा निधी दिला होता. मात्र, हा निधी जिल्हा परिषदेने अद्यापही खर्च केला नाही. २३ मार्च २०१५ रोजी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या निधी खर्चास मंजुरी दिली. त्यातून पालखीतळावर शौचालय, पाणीपुरवठा, वीज, रस्ते व आरोग्यविषयक सुविधा देणे अपेक्षित आहे. दर्शनरांगेत वारकऱ्यांना मोफत चहा व पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. चहा रांगेत टप्प्याटप्प्यावर ठेवायचा की स्वयंसेवकांच्या मदतीने वाटप करायचे, याचा निर्णय अजून झालेला नाही