आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vasant Purake Comment On Sushilkumar Shinde At Solapur

\'सुशिलकुमार शिंदेंच्या रूपात देशाला आगामी पंतप्रधानपद मिळेल\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर जिल्ह्याला दूरदृष्टी असलेला नेता मिळाला आहे. त्यांनी भविष्याचा विचार करीत सोलापूरचा विकास केला आहे. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपात सोलापूरला आगामी काळात पंतप्रधानपद मिळेल, असे प्रतिपादन विधानसभेचे उपसभापती वसंत पुरके यांनी केले.

कुंभारी येथील अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराच्या समारोप समारोहाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त बिपीन पटेल, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेत्रतज्ज्ञ पद्मर्शी डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, महापौर अलका राठोड, उपमहापौर हारून सय्यद, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, अधिष्ठाता माधवी रायते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी पुरके म्हणाले, ‘आधुनिक काळात डॉ. तात्याराव लहाने नावाचा संत पाहावयास मिळत आहे हे भाग्याचे आहे. त्यांनी शिष्यांना फक्त दिले त्यांच्याकडून कधी काहीच घेतले नाही. अशा गुरूची आज समाजाला गरज आहे. गुरूच्या नावाने टाइमपास करणारे लोक समाजाला घातक आहेत. महाराष्ट्राला लहाने यांचे पारंगत नेतृत्व लाभत आहे. तसेच लोकमान्य, लोकनिष्ट असे नेतृत्व सुशीलकुमार शिंदे यांचे आहे, असे विचार पुरके यांनी व्यक्त केले.

या वेळी डॉ. लहाने म्हणाले, महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे सुशीलकुमार शिंदे यांचे कार्य आहे. त्यासाठी ते आज सर्वोच्च पदावर कार्यरत आहेत. आज जी काही समाजसेवा होत आहे ती फक्त माझ्या एकट्याच्या हातून झाले नसून, याचे र्शेय माझ्या टीमला जाते. आमच्या माध्यमातून जेव्हा लोकांना दृष्टी मिळते तेव्हा खूप आत्मिक समाधान मिळतो, असे मत व्यक्त करीत त्यांनी सोलापुरात मधुमेह जास्त प्रमाणात असल्याची चिंताही व्यक्त केली. या वेळी प्राथमिक स्वरुपात शस्त्रक्रिया झालेल्या दोन रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी राजशेखर शिवदारे, नगरसेवक दिलीप कोल्हे, तहसीलदार शिल्पा ठोकळे, किरीट पटेल, मेहूल पटेल, डॉ. राजेंद्र घुली, डॉ.सत्येश्वर पाटील, डॉ. सिद्धेश्वर करजखेडे, डॉ. मंजूनाथ पाटील आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व रुग्णांना काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. हे शिबिर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आली होती.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, ''केंद्रीय गृहमंत्र्यांना शिवसेनेकडून 'शुभेच्छा' कम् चिमटा!''