आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vasundhara Film Festival Start From 18 July In Solapur

18 जुलैपासून सोलापुरात वसुंधरा चित्रपट महोत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - येत्या 18 जुलैपासून सोलापुरात किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. चार दिवस चालणार्‍या या महोत्सवात स्पर्धा, प्रदर्शन, चित्रपट व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सोलापूरकरांना मिळणार आहे. वन विभागातील निवृत्त अधिकारी संजय भोईटे व जलबिरादारीचे महाराष्ट्राचे संघटक सुनील जोशी यांना वसुंधरा पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

किलरेस्कर आणि वसुंधरा क्लब यांच्या पुढाकारातून हा महोत्सव होत आहे. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार्‍या या महोत्सवासाठी सोलापूर विद्यापीठ, लोकमंगल प्रतिष्ठान, सृजन फिल्म सोसायटीचा सहयोग महोत्सवात लाभणार आहे. शहरातील 10 शाळा, काही महाविद्यालये, सामाजिक वनीकरण विभाग, हरितक्रांती सेना, रोटरी क्लब, इन्टॅक्ट यासह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांचे सहकार्य मिळाले आहे. यावर्षी महोत्सवासाठी ‘जल संरक्षण, भविष्य रक्षण’ हा विषय निवडण्यात आला आहे.

असे होतील कार्यक्रम
18 जुलै : दुपारी दोन वाजता पथनाट्य. सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन. सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यान होईल. 19 जुलै : सकाळी 7 वाजता पर्यावरण दिंडी. दुपारी 2 वाजता चित्रकला स्पर्धा. सायंकाळी पाच वाजता महोत्सवाचे उद्घाटन व चित्रपट प्रदर्शन. वसुंधरा मित्र पुरस्कार वितरण व व्याख्यान.

20 जुलै : सकाळी 7 वाजता हेरिटेज वॉक . 9.30 वाजता प्रo्नमंजूषा स्पर्धा. 10 वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी हसत खेळत पर्यावरण. दुपारी 2 वाजता ‘सोलापूरची पाणी पंचायत’. सायं. पाच वाजता चित्रपट प्रदर्शन.

21 जुलै : सकाळी 7 वाजता वॉक फॉर वॉटर. सायंकाळी पाच वाजता समारोप.

पक्षी, पर्यावरणप्रेमींचा गौरव
19 वर्षे वनविभागात सेवा करणारे सोलापूरचे तानाजी भोईटे यांना वनमित्र पुरस्कार दिला जाणार आहे. 54 विविध प्रजातीच्या पक्ष्यांच्या पिसांचा संग्रह त्यांनी केला आहे. जखमी वन्य प्राणी व पक्षी आढळल्यास त्यावर उपचार करून त्यांना निसर्गात सोडण्याचे काम त्यांनी केले आहे. याशिवाय बार्शी तालुक्यातील हळदुगे येथील मूळचे रहिवासी सुनील जोशी यांना सन्मानित केले जाणार आहे. त्यांनी सोलापुरात पत्रकारिता आणि सध्या ‘जल बिरादारी’चे महाराष्ट्र संघटक म्हणून काम पाहात आहेत.