आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vasundhara International Film Festival Issue At Solapur

वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत नेचर वॉक, शालेय विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सकाळी 7.30 ची वेळ. हवेत असणारा गारवा, गवताच्या पात्यांवरील दवांमुळे ओलेचिंब झालेली पावले, पक्ष्यांच्या किलबिलाटात कोवळी सूर्यकिरणे अंगावर झेलत निघालेल्या निसर्गमित्रांनी शनिवारी पाहिली राखी बगळ्यांची कॉलनी, झाडांवर भरलेली पाणकावळ्यांची शाळा, शुभदश्रनी धनेश पक्ष्यासह झाडांची शास्त्रीय व आयुर्वेदीय माहिती घेतली. निमित्त होते, किलरेस्कर-वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील निसर्ग फेरीचे.

विजापूर रस्तालगत स्मृती उद्यानात निसर्ग फेरीसाठी पर्यावरणप्रेमींची गर्दी झाली होती. सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक अशोक पाटील यांनी स्मृतिवनातील उपक्रमांची माहिती दिली. अवकाश निरीक्षण केंद्रात तारे, गृहांचा मागोवा घेऊन त्यावर ही दुर्बीण स्थिरावते, अशी माहिती विज्ञान अभ्यासक प्रा. सी. ना. पुराणिक यांनी दिली.

संभाजी तलावाच्या काठावर शिकारीच्या शोधात फिरणारे राखी बगळे दिसून आले. येथील दलदलीत त्यांची कॉलनी वसल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक भरत छेडा यांनी दिली. रेल्वे रूळाच्या शेजारील झाडांवर अनेक पाणकावळे पंख उघडून ते वाळवत होते. त्या झाडावर दररोज कावळ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे सकाळी व सायंकाळी या झाडांवर जणू कावळ्यांची शाळाच भरलेली असते, असेही सांगण्यात आले. धनेश पक्ष्यासह पाणपक्ष्यांची माहिती देण्यात आली. डॉ. विक्रम पंडित यांनी वनऔषधी झाडांची माहिती दिली. सुभेदार पेठकर यांनी उपक्रमांची माहिती दिली.
फेरीमध्ये अमोल चाफळकर, मॉर्डन हायस्कूलचे विद्यार्थी, सिद्धेश्वर प्रशालेचे हरित सेना शिक्षक शिवानंद हिरेमठ, कुचन प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांसह किलरेस्कर फेरस कंपनीचे ऋषिकेश कुलकर्णी, दैदीप्य वडापूरकर आदी होते.
समृद्ध इको-लायब्ररीचे दश्रन
स्मृती उद्यानात उभारण्यात आलेल्या पहिल्या इको लायब्ररीमध्ये 20 लाखांपेक्षा जास्त किमतीची पर्यावरणविषयक पुस्तके असून, हे ग्रंथालय सर्वांसाठी खुले आहे. उद्यानामध्ये गांडूळ खत, जलपुनर्भरण, नक्षत्र उद्यान, काव्य उद्यानांची माहिती उपसंचालक पाटील यांनी दिली. झाडांची शास्त्रीय माहिती, आयुर्वेदीय महत्त्व यासह इतर माहिती विद्यार्थी वहीत नोंदवून घेत होते. त्याचदरम्यान उद्यानातील एका झाडावर राखी धनेश पक्षी दिसला. त्याच्या वैशिष्ट्यांबाबतची माहिती देण्यात आली.