आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वटपौर्णिमा नवा आयाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रिया वृक्ष पूजेचे व्रत करतात. पूर्वजांनीही समस्त वृक्षसृष्टीचा प्रतिनिधी म्हणून त्याचे पूजन केले आहे. पिंपळ, तुळस, वटवृक्ष, देवदार, उंबर अशा अनेक वृक्षांच्या औषधी गुणधर्मांबरोबरच उपयुक्तता जाणून घेतली पाहिजे.

नवयुगातील वटवृक्ष पूजा
आजकालच्या स्त्रियांना हे मान्य नाही, असे दिसून येते. देवळात किंवा वटवृक्षापर्यंत जाण्यासही त्यांना आता वेळ मिळत नाही. त्या आता वटवृक्षाची पूजा घरीच करू लागल्या आहेत. व्रतवैकल्यापेक्षा कामाला गाठ घालणे आज महत्त्वाचे मानले जाते. घरच्या घरीच महिला कुंकवाने (ओल्या) पाटावरती किंवा भिंतीवरती वटवृक्षाचे चित्र काढतात. त्यालाच धागा बांधतात व त्यांची पूजा करतात. याशिवाय बाजारामध्ये वटवृक्षाचे व देवतांचे चित्र असलेला एक रंगीत कागद मिळतो तो आणतात. देवाशेजारी तो चिटकवितात. त्यालाच दोरा चिटकवून त्याचीच पूजा करतात. नैवेद्य दाखवितात अणि वटपौर्णिमा साजरी करतात.