आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड आयुष्य मिळू दे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- धावपळीचे जगणे अन् पॅकेज सिस्टिम पगाराच्या युगात शुगर, बीपीच्या कचाट्यातून सोडव अन् पतीस उत्तम आरोग्य, आयुष्य दे, असा वर आजच्या आधुनिक सावित्रींनी गुरुवारी वटपौर्णिमेदिनी वडाची पूजा करताना मागितला. वाढत्या अपघातांचे प्रमाण अन् कामावरील ताणतणाव या गोष्टीतून सुटका होऊन आपल्या पतीला उत्तम आरोग्य कसे मिळेल, याचीच चर्चा पूजेच्या वेळीही महिला करत होत्या. शहरात ठिकठिकाणी उत्साहात महिलांनी वटपौर्णिमेची पारंपरिक पद्धतीने पूजा पार पडली.
जरीच्या साड्यांची रास
वटपौर्णिमेच्या पूजेसाठी खास ठेवणीतले शालू, लग्नातील जरीच्या साड्या काहीनी नऊवारी साड्या तर काही जणीनी रेडिमेड नऊवारी साड्या नेसून वटपौर्णिमा साजरी केली. महिलांनी परिधान केलेल्या भरजरी साड्या अन् त्यांचे मोहक गडद रंग याने महिलांच्या गटांकडे चटकन लक्ष वेधले जाते होते.
नटल्या लावण्यवती
वटपौर्णिमेचा सण हा महिलांच्या नटण्याथटण्याचा दिवस असतो. या दिवशी महिला सौभाग्य अलंकार परिधान करतात. त्या अलंकारांनी नटलेल्या महिला पूजेसाठी येतानाचे चित्र बर्‍याच ठिकाणी पाहवयास मिळाले. शालू, गजरा, हात भरून बांगड्या, सिंदूर, नाना प्रकारचे दागिने असा या लावण्यवतींचा साज होता. मात्र शहरात सुरू असलेल्या मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्यामुळे स्वत:चे संरक्षण करावे, असा संदेश देऊनही महिलांनी आपले हक्काचे नटणे सोडले नाही.

मुलींनीही केली पूजा
आई,काकू किंवा मामीसोबत आलेल्या चिमुकल्या मुलींनीही नऊवारी साड्या नेसून वडाची पूजा केली. यावेळी त्यांनी रीतसर पूजा करून वडाला सात फेर्‍या मारल्या. त्यांची हौस पाहून उपस्थित बर्‍याच जणींनी कौतुक केले.