आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंबर प्लेट रंगवण्यासाठी पेंटर मिळेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - फॅन्सी नंबर प्लेटवर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा तो नंबर प्लेट बदलून जागेवरच शासकीय नियमानुसार नंबर प्लेट रंगवून देण्याची मोहीम वाहतूक पोलिस सुरू करणार असल्याची घोषणा आठ दिवसांपूर्वी झाली. परंतु ही मोहीम अद्याप चालू झाली नाही. कारण पोलिसांना पेंटर मिळत नसल्याचे कारण समोर आले आहे.

वाहतूक पोलिसांकडून दररोज चौकात, नाकाबंदीत फॅन्सी नंबर प्लेट दुचाकीस्वारांवर कारवाई होते. पण नंबर प्लेट तसाच राहतो. यावर उपाय म्हणून साहाय्यक पोलिस आयुक्त मोरेश्वर आत्राम यांनी नंबर प्लेटच जागेवर रंगवण्यात येतील असे सांगितले होते. पण, पेंटर मिळत नाहीत. काहीजणांकडे चौकशी केली असता रंगवण्यासाठी पैसे जास्त सांगत आहेत. वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड नको म्हणून. कमी दरात रंगकाम करणार्‍या पेंटरची माहिती घेऊन दोन दिवसात ही मोहीम सुरू राहील असे र्शी. आत्राम यांनी सांगितले.

तेच पैसे पेंटरला दिले तर..
मागील वर्षभरात फॅन्सी नंबर प्लेट रंगवण्याची मोहीम झाली होती. त्यावेळी पोलिसांनी पेंटरला कमी पैसे दिल्याची माहिती मिळाली होती. फॅन्सीनंबर प्लेट दुचाकीस्वार आढळल्यास शंभर रुपये दंडात्मक कारवाई होते. तेच पैसे पेंटरला देऊन नंबर प्लेट रंगवून घेतल्यास ही योजना यशस्वी होईल. याचाही विचार व्हावा. आज काही पेंटरकडे चौकशी केल्यानंतर प्लेटवर पांढरा रंग मारून काळ्या रंगाने क्रमांक लिहिण्यासाठी 75 ते 100 रुपये खर्च (फक्त रंगवणे) येतो असे सांगितले.