आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vehicles Take High Security Number Plate Within Six Month

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहनांना सहा महिन्यांत हाय सेक्युरिटी नंबरप्लेट बसवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सुरक्षेच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्वच वाहनांना हायसेक्युरिटी नंबरप्लेट बसवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीच मध्य प्रदेश सरकारने तो निर्णय अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात येत्या सहा महिन्यांत तो टप्याटप्याने विविध शहरात लागू होणार आहे.

सोलापुरातील वाहनधारकांनादेखील आपली पूर्वीची नंबरप्लेट बदलून नवीन नंबरप्लेट बसविणे सक्तीचे होणार आहे. येत्या काही महिन्यात या निर्णयाची अंमलबजावणी सोलापुरात होणार आहे.

केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989च्या नियम 50 नुसार राज्यातील स्वयंचलित वाहनांना हा नियम लागू असणार आहे. यात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, ट्रक, ट्रॅक्टर आदी जड वाहनांचाही समावेश आहे. वाहनांचे चोरीला जाण्याचे प्रकारही वाढले आहेत. वाहनांची चोरी झाल्यानंतर चोर जुन्या नंबरप्लेट तोडून बदलून टाकतात. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी निर्माण होतात. मात्र, हायसेक्युरिटी नंबरप्लेटवर सहज बदल करता येणार नाही. त्यामुळे वाहनांची सुरक्षितता अबाधित राहणार आहे.

बदलता येणार नाही नंबरप्लेट : नवीन नंबरप्लेटवर क्रोमियम होलीग्रामचा वापर आहे. त्यावर खाडाखोड करून नवीन नंबर टाकता येत नाही. तसा प्रयत्न झाल्यास नंबरप्लेट पूर्ण खराब होते. त्यामुळे ते सहज लक्षात येते. यासाठी प्लेटमागे स्नॅपलॉक बसविण्यात येणार आहे.


असा असणार आकार
दुचाकी, तीनचाकी : 200 बाय 100 मिलिमीटर, हलकी मोटार : 340 बाय 200, प्रवासी : 500 बाय 120, मध्यम आकाराचे व्यापारी वाहन : 340 बाय 200. सध्या काही कंपन्या या प्रकारचे नंबरप्लेट तयार करून देत आहेत.
सध्या सुमारे बाराशे ते पंधराशे रुपये आकारत आहेत. तो दर कमी होऊन किमान तीन-चारशे रुपयांपर्यंत यावा, असा प्रयत्न राज्य सरकारचा आहे.


निविदा प्रक्रिया सुरू
परिवहन आयुक्तांच्या स्तरावर नंबरप्लेट उत्पादक व पुरवठादारांकडून निविदा मागविण्यात येत आहे. याचे काम आणखी दीड ते दोन महिने चालणार आहे.


बारकोडमुळे चोरटे येतील जाळ्यात
नंबरप्लेटवरील होलोग्रामच्या खाली आणि वाहनक्रमांकावर सात अंकाचा बारकोड असणार आहे. एखादा वाहनचालक सिग्नल तोडून पुढे गेल्यास अथवा चोर गाडी चोरून पळून जात असेल तर बारकोडच्या इन्फ्रारेड कॅमेर्‍याच्या मदतीने मूळ क्रमांक चटकन लक्षात राहणार आहे.


प्रादेशिक परिवहन विभागाकडे लवकरच स्कॅनर देण्यात येणार आहे. स्कॅनरच्या मदतीने जरी गाडी भरधाव वेगाने जात असेल तरी त्याचा क्रमांक यात नोंद होऊ शकतो. त्या क्रमांकावरून वाहनचालकाचे नाव, पत्ता सहज उपलब्ध होणार आहे.
नवीन वाहन खरेदी करणार्‍यांना वाहन खरेदी करतानाच हे नंबरप्लेट बसवावे लागणार आहे. जुने असलेल्यांना बदलण्यासाठी काही महिन्यांची मुदत दिली जाणार आहे. याचे दर सर्वसामान्यांना परवडावे म्हणून राज्य सरकारकडून प्रयत्न चालू आहे.’’ अनिल वळीव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभाग.