सोलापूर - अवघ्या चार दिवसांवर व्हॅलेंटाइन डे (14 फेब्रुवारी) आला असून या दिवसाच्या स्वागताची जय्यत तयारी तरुणाईत दिसून येत आहे. या दिवशी आपल्या जोडीदाराला शुभेच्छापत्रे, टेडी, ब्रेसलेट, हार्टशेप वेलवेट टेडी आदी वस्तू भेट म्हणून दिली जाते. यंदा या वस्तू विकत आणण्यापेक्षा आपल्या हाताने तयार करून भेट म्हणून देण्याचा ट्रेंड तरुणींमध्ये दिसत आहे.तसेच भेट देण्यासाठी चॉकलेटला चांगली पसंती आहे.
पोस्टकार्ड पत्रावरही प्रेमाचा संदेश
आपआपसात देण्यासाठी पोस्टाची यंत्रणा न वापरता केवळ लव्ह मेसेज देण्यासाठी युवक-युवती हे पोस्टाच्या जुन्या अँटिक पत्राचे संदेश देण्यासाठी उपयोग करत आहेत. त्यावर वेगळ्या पद्धतीने मेसेज देऊन तो डेकोरेटिव्ह दिसण्यासाठी विशेष धडपड करत आहेत.
बाजारात वस्तूंची रेलचेल
बाजारात 3 ते 800 रुपयांपर्यंत शुभेच्छापत्रे आहेत. टेडी बेअर, छोट्या आकाराच्या हार्टशेपच्या भेटवस्तू, कॉफी मग विथ लव्ह मेसेज, रोज मेसेज स्क्रोल असतानाही युवतींना मात्र त्यांच्या जोडीदाराला आपल्या हातून तयार केलेल्या शिवाय आवडीच्या गोष्टींचे रंग घेऊन गिफ्ट तयार क रण्याचे वेड लागले आहे. त्याने रेडिमेडपेक्षा विविध दुकानांतून कच्चा माल घेऊन तो कलाकुसरीने तयार करण्यात सध्या गुंग आहेत.
चॉकलेटचीही सरबराई
मोठय़ा आकाराच्या चॉकलेटवर विविध प्रकारच्या डिझाईनचे काम करून त्या वर्कमध्ये लपेटून ती भेट देण्यासाठी मोठय़ा आकाराच्या चॉकलेटचा ट्रेंड सुरू आहे. तो घरीच तयार करून त्यावर डेकोरटिव्ह काम केल्याने देखणा दिसण्यासाठी विशेष मोती क्रॅकल्स आणि सुका मेवा याचाही वापर करत आहेत. मात्र, यात प्रामुख्याने चॉकलेटला आधिक प्राधान्य दिले जात आहे.
पुढे वाचा छोट्या कार्डलाही मिळतेय पसंती ........