आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veteran Actress Fayyaz Elected For Drama Festival

‘बिनविरोध निवडीचा आनंद अधिक’- ज्येष्ठ अभिनेत्री फय्याज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- ५०वर्षांच्या कारकीर्दीची पावती म्हणजे बेळगाव येथे होणाऱ्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली हे होय. ती बनिविरोध झाली याचा अधिक आनंद आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री फय्याज यांनी व्यक्त केले.

डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात अखिल भारतीय नाट्य परिषद मुख्य शाखा, उपनगरीय मंगळवेढा, अकलूज पंढरपूर शाखा महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होेत्या.

यावेळी मंचावर महापौर सुशीला आबुटे, ज्येष्ठ गायिका सुलभा पशिवीकर, प्रकाश यलगुलवार, नागेश सुरवसे, दीपक देशपांडे, यतिराज वाकळे, दिलीप कोरके, विनोद माहािडक उपस्थित होते. पशिवीकर यांच्या हस्ते फय्याज यांचा शाल, श्रीफळ, सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार झाला.

त्या म्हणाल्या, सोलापूरकरांनी भरभरून प्रेम केले. पदोपदी कामाची पावती दिली. आज मागे वळून पािहले असता माझ्या हातून बरेच काही सुटून गेल्याचे दुख आहे.

फय्याज यांनी पद्माकर देव, डॉ. रंगणेकर, कम्पल्ली, परांजपे, शिवशरण, घाेरपडे, मधू पाठक, निरंजन पुजारी, गोकर्ण, उत्तम बाबूराव कसबे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या आत्मचरित्रही लििहणार असल्याचे सांगितले. सन्मानपत्राचे वाचन अनिरुद्ध जोशी यांनी केले. परिचय शोभा बोल्ली यांनी करून दिला. सूत्रसंचालन जितेश कुलकर्णी यांनी केले.
अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा, ज्येष्ठ अभिनेत्री फय्याज यांचा सत्कार करताना गायिका सुलभा पशिवीकर. त्यावेळी (डावीकडून) नागेश सुरवसे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, महापौर सुशीला आबुटे, प्रा. दीपक देशपांडे.
अन् डोळे पाणावले...
पहिला शब्द बोलण्यासाठी फय्याज उभ्या असता सुखदुखाच्या अश्रुंनी त्यांना भरून आले होते. सोलापूरचे सहकारी, कलावंत, आई आणि आजी यांच्या आठणीने मन हळवे झाले होते. सोलापूरच्या नाट्य संमेलानाचे अध्यक्ष व्हायचे होते. पण हाऊ शकले नाही, ही सल उरात आहे अशी भावना व्यक्त केली. हसऱ्या चेहऱ्याच्या फय्याज यांना सुरेश भटांच्या कविता सादर करताना अश्रुंचा बांध मात्र कोसळला. रसिकांनाही अनावर झाले.