आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vice Chancellor Dr. N. N. Maldaar, Latest News In Divya Marathi

विविध मातृभाषांना जोडण्यात हिंदी भाषेचे मोलाचे योगदान- कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मराठी, तेलुगु व कन्नड अशा विविध मातृभाषांना जोडण्यात राष्ट्रभाषा हिंदीचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन सोलापूर विद्यापाठीचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी केले. र्शी बृहन्मठ होटगी संचलित एस.व्ही.सी.एस.बी.एड्. महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने ‘संत साहित्याच्या दृष्टिकोनातून हिंदी व दक्षिण भारतीय भाषा यांचा सहसंबंध’ या विषयावर आयोजिलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशनाचे उद्घाटन गुरुवारी कुलगुरू डॉ. मालदार यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष डॉ. दामोदर खडसे अध्यक्षस्थानी होते. या वेळी माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, साहित्यिक डॉ. त्रिभुवन राय, साहित्यिक ऋषभदेव शर्मा, मराठी-हिंदी साहित्यिक डॉ. लक्ष्मण पाटील, डॉ. गिरिजा गुर्रमकोंडा, डॉ. काशिनाथ अंबलगे, होटगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णाराव कुंभार, सहसचिव शांतय्या स्वामी, डॉ. राजशेखर हिरेमठ, डॉ. शीला स्वामी आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. मालदार म्हणाले, ‘‘हिंदीबरोबर प्रत्येकाने ज्ञानभाषा इंग्रजीचे ज्ञान आत्मसात करावे.’’ प्रा. भगवान आदटराव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सतीश पन्हाळकर यांनी आभार मानले.