आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidhan Sabha Election Issue At Solapur, Divya Marathi

विधानसभेची लगीनघाई ४९ कोटींच्या कामांना मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातीलखराब रस्त्याचे भाग्य उजळणार असून, प्रमुख मार्गांवरील एमएसआरडीसीच्या सात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १७ कोटींसह जलवाहिनी, उद्यान आणि स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी ४९ कोटींच्या कामास महापालिका सभागृहात एकमताने मान्यता देण्यात आली. ही कामे आचारसंहितेपूर्वी मार्गी लागावीत, यासाठी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी तातडीने अधिकाऱ्यांना बोलावून स्थायी समितीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले. दोन दिवसांत आचारसंहिता लागेल या अंदाजाने कामास प्राधान्य देण्यासाठी स्थायी समितीने तातडीने सभा घ्यावी, असे पत्र स्थायी समितीस देण्याचा विचार मनपा प्रशासनाकडून सुरू आहे.
२० आॅगस्ट रोजी तहकूब झालेली मनपाची सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली सभेच्या कामकाजाला प्रारंभ झाला.विधानसभा निवडणूक आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मनपातील सत्ताधाऱ्यांनीही विकासकामांना गती दिली आहे. मंगळवारच्या सभेत ६० मिनिटांत ४२ विषयांवर चर्चा झाली. त्यापैकी अजेंड्यावरील तीन आणि लक्षवेधी तीन विषय होते.
स्थायीची सभा बोलावणार
आयु्क्तांनीतातडीने पत्र दिल्यास नियमानुसार स्थायीची सभा काढता येत असेल तर बोलावणार आहे. बाबामिस्त्री, सभापती, स्थायीसमिती
* होम मैदान येथे सुरक्षा भिंत बांधण्यास परवानगी
* ज्येष्ठ नागरिकांना जलतरण तलावासाठी ५० टक्के सवलत
* सात रस्ता येथील कोटणीस बागेत बाबू जगजीवनराम पुतळा उभारणे
* मनपाच्या ८६४ कायम कामगारांची रोजंदारी सेवेतील सेवा ग्राह्य धरणे
* शालेय विद्यार्थ्यांना ५५ ऐवजी ७५ टक्के सिटीबस पास सवलत
* गणपती आणि नंदीध्वज मिरवणूक मार्गावर अंडरग्राऊंड केबल टाकणे
* नवजात शिशू रुग्णालयासाठी आरोग्य संस्थेस जागा उपलब्ध करणे
* मार्कंडेय जलतरण तलाव येथे एमपीएससी आणि यूपीएससी स्टडी सेंटर करणे