आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदू मिलनंतर रिपब्लिकन सेनेचे लक्ष विधानसभा निवडणुकीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - इंदू मिलच्या यशस्वी लढय़ानंतर रिपब्लिकन सेना विधानसभा निवडणुकीत उतरत आहे. त्याच्या निकालातूनच या पक्षाची ताकद दि सून येईल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ निकाळजे यांनी गुरुवारी येथे सांगितले. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा जुना एम्प्लॉयमेंट चौकातील इंद्रप्रस्थ सभागृहात सायंकाळी झाला. प्रदेश सरचिटणीस भाई सावंत अध्यक्षस्थानी होते.
आंबेडकरी चळवळीला उभारी देण्यासाठी या पक्षाची स्थापना झाली. त्याच्या माध्यमातून आंबेडकरी अस्मितेची लढाई मुंबईत जिंकली. इंदू मिलच्या जागेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक होत आहे. त्याचे र्शेय केवळ आनंदराज आंबेडकर यांनाच आहे. सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी ताकद दिली. हीच ताकद विधानसभा निवडणुकीत पणाला लावू. विधानसभा काबीज करू, असा निर्धार र्शी. निकाळजे यांनी या वेळी केला.
या वेळी पक्षाचे मुंबई युवा अध्यक्ष दयानंद परिक्षाळे, उस्मानाबाद जिल्हा निरीक्षक भारत सरवदे, जिल्हाप्रमुख मिलिंद प्रक्षाळे, संघटक अँड. गौतम खरात, युवा जिल्हाध्यक्ष उमेश गायकवाड, विजयानंद उघडे, संजय बाबरे, भैरू कांबळे, बापू कांबळे, विद्यार्थी सेनेचे रोहित रासे, संतोष सवईसर्जे, दत्ता मसलखांब, अतिश शिरसट आदी उपस्थित होते.