आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा २०१४चे काउंटडाऊन सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून पुणे येथे २१ व २२ ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या ११ उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय निवडणुकीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची मािहती संकलित केली जात आहे. पोिलस अधिकारी व कर्मचारी वगळून शिपाई ते मतदान केंद्र अधिकारीपर्यंत २१ हजार कर्मचारी लागणार आहेत.

११ मतदारसंघांमध्ये ३ हजार २९० मतदान केंद्रे
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघामध्ये ३ हजार २९० मतदान केंद्रांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघासाठी आरक्षित मतदान यंत्रासह ३ हजार ६२० मतदार यंत्रे लागणार आहेत. सध्या निवडणूक कार्यालयाकडे ४ हजार ३०० बॅलेट युनिट व ५ हजार ९०० कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत.

५० टक्के मतदान यंत्राची तपासणी झाली पूर्ण
रामवाडी गोदामामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या मतदान यंत्राची तपासणी सुरू आहे. आजपर्यंत एकूण यंत्रापैकी ५० टक्के यंत्रांची तपासणी झाली आहे. हैदराबाद येथील पथकाकडून प्रतिदिन ४०० यंत्रे तपासली जात आहेत. येत्या ८ दिवसांमध्ये उर्वरित यंत्रे तपासण्यात येणार आहेत.
आता बदल्यांचे सत्र
विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात एकाच पदावर तीन वर्षे पूर्ण झालेल्या व स्व जिल्हा असलेल्या अधिकाऱ्यांची बदली होणार आहे. लोकसभा निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांची बदल्या झाल्याने या वेळी किती अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार हे नक्की सांगता येणार नसल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे यांनी सांगितले.
माहिती संकलन सुरू
सोलापूर जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. ११ विधानसभा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिवाय निवडणुकीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची मािहती संकलित करण्याचे काम सुरू आहे.
श्रीपती मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी