आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिळेल तो पक्ष नाहीतर अपक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अभी नही तो कभी नही ! हे धोरण राबवत राज्य आणि जिल्ह्यात सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे वजनदार कार्यकर्ते आगामी विधानसभा निवडणूक कसल्या प्रकारे लढवायचीच. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी, लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष् विरोधातील जनतेचा कौल, घडामोडी पाहता मिळेल तो पक्ष िकंवा अपक्ष अशी भूमिका घेत जलि्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे, जलि्हा बँकेचे संचालक सुरेश हसापुरे व जलि्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक आगामी विधानसभा निवडणूकीस सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत. यामध्ये हसापुरे आणि परिचारक यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचीही जिल्ह्यात चर्चा आहे.
जिल्ह्यातील ११ मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद
११ विधानसभा मतदारसंघ असलेल्या सोलापूर जिल्ह्यात अपक्ष मात्र राष्ट्रवादी कोट्यातून मंत्री झालेले पालकमंत्री, वदि्यमान ४ आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जलि्हा बँक, जिल्हा दूध संघ व महापालिकेत उपमहापौर अशी राजकीय ताकद आहे. मात्र गेल्या ५ वर्षामध्ये लक्ष्मण ढोबळे व दिलीप सोपल यांच्याकडे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली होती. या दोघांच्या कामाविरोधातही नाराज स्थाविक पदाधिकारी व कार्यकर्ते थेट पक्षाच्या प्रमुखांपर्यंत तक्रारी केल्या. याचाही परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय जलि्हा परिषद व जलि्हा बँकेच्या पदाधिकारी निवडीत झालेल्या राजकारणाचाही परणिाम आगामी निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

मामांचे आहे करमाळा मतदार संघाकडे लक्ष
जलि्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या करमाळा मतदारसंघातून मी जनमताची चाचपणी करीत असल्याचे सांगून तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे जलि्हा बँकेचे संचालक व जलि्हा परिषदेचे सदस्य सुरेश हसापुरे यांनी काँग्रेसकडील दक्षणि सोलापूर मतदार संघातून गावभेट दौरा सुरू केला आहे. सोलापूर बाजार समिती निवडणुकीतील पराभव न वसिरता मिळेल तो पक्ष अन्यथा अपक्ष या इराद्यानेच तयारी सुरू केली आहे. मंगळवेढा- पंढरपूर विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून बाजी मारलेले आमदार भारत भालके यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षासोबत राहत आपला हेतू साध्य केला. मात्र भालके यांच्यामुळे पंढरपूर मतदार संघातील काँग्रेस व राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांची कोंडी झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रशांत परिचारक हे शवसिेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा असताना ते शिवसेनेत जाण्याचे अंतिम झाल्याचे सूत्रांकडून कळते. माजी महापौर मनोहर सपाटे, शहराध्यक्ष महेश गादेकर यांनीही दक्षणि सोलापूर, शहर मध्य वा शहर उत्तर यापैकी एक मतदारसंघ सोडण्याची मागणी केली आहे. मात्र मतदारसंघ न सोडल्यास अपक्ष लढवणि्याची शक्यता आहे. एकंदरीत जलि्ह्याच्या सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी मिळेल तो पक्ष अन्यथा अपक्ष हीच भूमिका ठेऊन निवडणूक लढवणिार असे चित्र आहे.
तिकीट कन्फर्म असलेलेही इतर पक्षाच्या शोधात...
राष्ट्रवादीकडून तिकीट कन्फर्म असलेले जिल्ह्यातील राष्ट्रवादीचेच निष्ठावंत उमेदवारही इतर पक्षांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांकडून कळते. प्रत्येक मतदारसंघामध्ये वाढलेले पक्षीय राजकारण, पक्षांतर्गत विर्माण झालेली तेढ, लोकसभा विवडणूक निकालानंतर विर्माण झालेला जनतेचा कौल ही सर्व परसि्थिती विचारात घेऊन चाचपणी सुरू असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. अमुक पक्षाचा म्हणून मतदारसंघातील वाढत्या इच्छुकांचे दरवाजे बंद करण्यासाठी अशा पद्धतीची नीती वापरली जाण्याची अधिक शक्यता आहे.