आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विडी संस्थांची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेस विडी कामगारांची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सहकारी विडी उत्पादक संस्था कामगारांची दिशाभूल असून, त्यांच्या हक्कांवर गदा आणण्याची व्यवस्था आहे. अशा संस्थांची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस विडी कामगार सेलने केली. याबाबत सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करणार असल्याचे सेलचे अध्यक्ष डॉ. गोवर्धन सुंचू यांनी म्हटले आहे.

कामगार कायदे पायदळी तुडवण्यासाठी ठेकेदारी पद्धतीलाच परवाना मिळवण्याचा हा प्रकार आहे. समभाग म्हणून कामगारांकडून रकमा वसूल करणे, बदल्यात विड्यांचे काम देणे आणि कामगार व्याख्येतील सवलती नाकारणे यालाच ‘सहकार’ म्हणायचे का? भांडवली व्यवस्थेतून निर्माण झालेल्या या संस्था आहेत. त्यात कामगारांची पिळवणूक आहे. त्याच्या विरोधात सर्व कामगार संघटनांनी एक होऊन लढा दिला पाहिजे. भागधारक म्हटल्यानंतर या कामगारांना नफ्यातून वाटणी (लाभांश) का नाही?, असा सवालही त्यांनी केला.

ही तर धूळफेक
सहकारी संस्था, त्याचे संचालक आणि सभासद ही संस्थांर्गत बाब झाली. त्यात काम करणारे कामगार असतात. त्यांच्यासाठी कंपनी कायदा लागू होतो. सहकारी सूत गिरण्या असोत, की साखर कारखाने तिथे अशीच पद्धत आहे. परंतु विडी उत्पादक सहकारी संस्थांमध्ये कामगारांनाच समभागधारक दाखवून कामगार कायदेच नाकारण्यात आले. ही धूळफेक असून, त्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल.
- डॉ. गोवर्धन सुंचू, अध्यक्ष विडी कामगार सेल