आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्रोही चळवळ अधिक गतिमान करण्याची गरज : प्रतिमा परदेशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - प्रस्तापितसाहित्य संस्कृती ही विषमता मूलक आहेत, त्याला नकार देत पर्यायी साहित्य संस्कृतीची चळवळ गतिमान करण्याचा निर्णय विद्रोही चळवळीच्या बैठकीत आज झाल्याची माहिती विद्रोही चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी यांनी दिली.
दत्ता चौकातील शुभराय टॉवर येथील कार्यालयात अॅड. रा. गो. म्हेत्रस यांच्या अध्यक्षतेखाली विद्रोही चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक झाली, यावेळी परदेशी बोलत होत्या. बैठकीस विष्णु गायकवाड, अॅड. मिलिंद गडदे, हसीब नदाफ, बाबू बनसोडे, चन्नप्पा सावळगी, फारूख शेख, वामन वळवी, रोहन माने, राम गायकवाड, विश्वास गायकवाड, विवेक कनकुडे, रेहाना बेग उपस्थित होते. समतावादी संस्कृतीचा जागर करीत असताना बदलते संस्कृतीकरण राजकारणाबरोबरच आरएसएस धर्मांध जातीयतेचा आढावा बैठकीत घेतला गेला.

विद्रोहीधार धारदार बनणार
भटक्याविमुक्त सर्व जात पंचायतींच्या विरोधात ही विद्रोहींची भूमिका या मेळाव्यात स्पष्ट होईल. समाजातील भयानक वास्तवेवर विद्रोहीतून आवाज उठवित असताना ,केंद्रीय पातळीवर महाराष्ट्रात जे राजकीय स्थित्यंतर झाले आहे, त्याचाही विचार विद्रोही चळवळ करते आहे. संस्कृती आणि साहित्य, राजकीय, सामाजिक क्षेत्राप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातही मोठे आव्हान उभे राहिलेय, या विरोधात विद्रोही चळवळ संघर्ष करेल, असा निश्चयही यानिमित्त बैठकीत झाला. २६ नोव्हेंबर ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संविधान वाचन उपक्रम होईल.

मनूस्मृती दहन
२५डिसेंबरला सोलापुरात विद्रोही महिला मेळावा आयोजित केला जाणार आहे. त्यात पहिल्या विद्रोही साहित्य संमेलेनाच्या अध्यक्षा झालेल्या विमल मोरे त्यांचा जाहीर सत्कार या मेळाव्यात होणार आहे. मनुस्मृती दहन ही या मेळाव्यात होईल.