आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Viewers Credit Card Give To Hand Maker's At Solapur

सोलापुरात विणकरांना मिळणार ‘विव्हर्स क्रेडिट कार्ड’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गरीब, सामान्य विणकरांना स्वस्त व्याजदरात अर्थसाहाय्य करण्यासाठी राज्य शासनाने ‘विव्हर्स क्रेडिट कार्ड’ योजना आणली आहे. त्यामार्फत साडेबारा टक्के व्याजदराने दोन लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार असून, त्याला तीन टक्के व्याज सवलत आहे. शिवाय 4 हजार 200 रुपयांचे अनुदानही आहे. या योजनेसाठी सोलापुरात 160 विणकरांची नोंदणी झाली.
नवी दिल्लीच्या हातमाग विकास आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार नागपूरच्या वस्त्रोद्योग सहसंचालकांनी योजनेचे परिपत्रक काढले आहे. विणकर संस्था, खासगी विणकर यांना या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने शिबिरे घ्यावीत, लाभार्थ्यांची निवड करावी, त्यांना योजना समजावून द्यावी, असे त्यात म्हटले आहे.