आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - आम आदमी पक्ष (आप) हा जनतेचा पक्ष आहे. भ्रष्टाचार झाडूने साफ करणार्यांचा पक्ष. सत्तेच्या जोरावर भ्रष्ट राजकारण यापुढे चालणार नाही. आता हीच वेळ आहे चोरांना त्यांची जागा दाखवण्याची. ‘आप’ आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी सज्ज असेल. लोकांचेच प्रतिनिधी निवडणुका लढवतील. इतर ठिकाणी सोडा आता बारामतीतून जिंकून दाखवा, असे खुले आव्हान शरद पवार यांचे नाव न घेता ‘आप’चे नेते, निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी रविवारी येथे दिले.
हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किलरेस्कर सभागृहात सायंकाळी ‘आप’ची सभा झाली. तीत ते बोलत होते. श्री. पांढरे म्हणाले, सत्ता परिवर्तन नव्हे तर व्यवस्था बदलण्यासाठी या लढय़ात आम आदमी उतरत आहे. सिंचन घोटाळा 70 हजार कोटींचा असून हे प्रकरण सीबीआयपर्यंत नेले जाईल. लोकपालांकडे सर्वप्रथम याच घटनेची तक्रार करण्यात येणार आहे. या चोरांनाच आता माहीत नाही लोकपाल म्हणजे काय? सह्या करून मोकळे झालेत. मंचावर पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते विद्याधर दोशी, विजय तन्वर, अँड. शकील अहमद, चंदुभाई देढिया उपस्थित होते. अर्जुन कृष्णचंद्र जगताप यांना ‘आप’तर्फे मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. उमा बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले.
सांगोल्याची टेंभू योजना
सांगोल्याची टेंभू योजना आणणार हे आश्वासन गेल्या 50 वर्षांपासून दिले जाते. एक टिपूस पाणी दिसले नाही अजून. सहा स्टेजसाठी लागणार्या पंपाचे एचपी बेरीज केली तर किती होईल कल्पना आहे काय? सव्वादोन लाख एचपी इतकी मोठी योजना प्रत्यक्ष अस्तित्वात येण्यासाठी अनंत कालावधी लागू शकतो. या पंपाची खरेदीपण झाली. पाइप खरेदी झाले. प्रत्यक्षात आहे काही? यातील टक्केवारी केव्हाच लाटली गेली. प्रकल्प होईल तेव्हा होईल.
मोदींची लाट खोटी
पुढील विधानसभेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस साफ झालेली दिसेल. मोदी लाटेचा तर विचारच करू नका. त्या लाटेची चर्चा खोटी आहे, हे दिल्लीनेच दाखवून दिलेय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.