आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय जनता पक्ष विकासाच्‍या मुद्दावरच निवडणुका लढविणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - भारतीयजनता पक्ष शिवसेना यांच्यात याआधी ठरलेल्या जागा वाटपानुसार जिल्ह्यातील ११ विधानसभा जागांपैकी माळशिरस, शहर उत्तर आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आहेत. यािशवाय इतरही जागांची मागणी प्रदेश भाजपकडे करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली. विधानसभेलाही मोदी लाट कायम राहणार असल्याचा दावाही श्री. देशमुख यांनी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला. शहराचे अनेक प्रश्न आघाडी सरकारने सोडवले नाही. पंतप्रधान मोदी यांच्या कामाचा सपाटा आिण त्यांची सोलापूर विषयीची कटिबद्धता पाहता युती शासन सोलापूरचे प्रश्न सोडवेल, असे ते म्हणाले.
1 .िवधानसभा कोणत्यामुद्यावर लढणार
-पक्ष पातळीवर संचलन समिती आहे. त्यात प्रदेश पातळीवरून मकरंद देशपांडे आिण योगेश गोगावले यांच्याकडे जबाबदारी आहे. निवडणुकीचे मुद्दे ते ठरवतील. असे असले तरी विकासाला प्राधान्य असणारच. शहरातील रस्ते, बायपास रस्ते, पाणी पुरवठा, नागरी सुविधा, आरोग्य, ड्रेनेज समस्या या मुद्द्यांवर आमचा भर असेल.

2लोकसभानिवडणुकीच्या वेळी मोदी लाट होती, ती विधानसभेलाही असेल का?
- मोदी यांची लाट कायम राहणार आहे. मोदी लाट ओसरली म्हणणाऱ्यांना मतमोजणीच्या वेळी लाट दिसून येईल. पंतप्रधान मोदी यांनी लावलेला कामाचा सपाटा पाहता मोदी लाट कायम असेल. सोलापूरच्या विकासासाठी श्री. मोदी यांनी सोलापुरात येऊन कटिबद्धता व्यक्त केली. त्यामुळे सोलापूरचे नागरिक आमच्यावर विश्वास ठेवतील. त्यामुळे राज्यात युतीचीच सत्ता येईल.

3 शहरभाजपमधील संघर्षाचे काय?
- शहरात संघर्ष नाही. पक्ष एकजूट आहे. त्याबाबत लवकरच पक्ष एकसंधपणे काम करताना दिसून येईल. आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने निवडणुकीचे काम सुरू केले आहे. त्यानुसार कार्यक्रम आणि आखणी सुरू केली आहे.

4 युतीव्हावी वाटते का?
-युती व्हावी का, प्रश्नच नाही. सध्याही आमची युती आहेच.

5 दक्षिणसोलापूर जागेची मागणी केली का?
- शहराच्या तीनही जागांची मागणी अाम्ही पक्षाकडे केली आहे. दक्षिण सोलापूरचा त्यात समावेश आहे. जागेच्या मागणीसाठी १५ दिवसांपूर्वी एक िशष्टमंडळ प्रदेश भाजपला भेटून आले आहे.