आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vijaysinh Mohite News In Marathi, Nationalist Congress, Madha Lok Sabha Seat

विजयसिंहांच्या पाठीशी आता फलटणचे पाटील, निंबाळकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांच्या उमेदवारीबाबत फलटणचे चिमणराव पाटील, रणजितसिंह निंबाळकर यांची नाराजी दूर केली आहे. जिल्हा बँकेचे माजी चेअरमन संजय शिंदे प्रचार करणार नसले तरी त्यांचा विरोध राहणार नसल्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह यांचे बंधू जयसिंह मोहिते यांनी जाहीर केले.


गुरुवारी अर्ज छाननीसाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयातील माढा निवडणूक कार्यालयात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत होते. प्रतापसिंह यांच्या उमेदवारीचा कोणताही फरक पडणार नाही. त्यांच्याकडून शरद पवार यांच्यावर टीका होत असली तरी आम्ही आजपर्यंत पवार यांनाच नेता मानून राजकारणात आहोत. पवारांच्या आदेशानुसार निवडणूक लढवित आहोत. ही निवडणूक मोठय़ा मताधिक्क्याने जिंकू, असा विश्वास जयसिंह यांनी बोलून दाखविला.


माण, फलटण येथील नाराजींची समजूत काढली आहे. माळशिरसमधून पारंपरिकपणे मताधिक्क्यासाठी खेचून आणू. माढय़ाचे संजय शिंदे प्रचारात नसले तरी आमदार बबनराव शिंदे आमच्यासोबत असल्याने तेथेही मताधिक्क्य मिळेल, असे ते म्हणाले.


चर्चेचा अधिकार विजयसिंहांना..
एकाच कुटुंबातील दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, हे खरे आहे. प्रतापसिंह यांनी उमेदवारी मागे घ्यावी, याविषयी चर्चा करण्याचा अधिकार फक्त विजयसिंह यांना आहे. तेच याविषयी निर्णय घेतील. विजयसिंहांची निवडणुकीत अडचण होईल का, यावर जयसिंह मोहिते यांनी याविषयी 17 मे रोजी चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया दिली.