आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vijaysinha Mohite News In Marathi, Divya Marathi, Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्थिरीकरणासाठी अखेरपर्यंत लढा, खासदार मोहिते यांचे आश्‍वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर - सत्तेत असो नसो, मी जनतेची कामे केली. पाण्याचे राजकारण आम्ही केले नाही. कृष्णा-भीमा िस्थरीकरण होणार नाही म्हणत काहीनी विरोध केला. पण हा प्रकल्प व्हावा, जिल्ह्यातील आम जनतेला पाणी मिळावे, यासाठी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहे, असे आश्वासन खासदार वजियिसंह मोहिते यांनी दिले.

वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे सोमवारी शेतकरी मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती गोपाळराव काेरे होते. या वेळी सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सीना नदीला कालव्याचा दर्जा मिळावा, वडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी केली. मोहिते पाटील म्हणाले, "(कै.) गुरुनाथ पाटील तालुक्याचे आमदार असताना मी पाटबंधारे राज्यमंत्री होतो. त्यावेळी दक्षिण सोलापूरला उजनीचे पाणी देण्यास मंजुरी दिली. आजच्या स्थितीला उजनीची क्षमता झालेले पाणीवाटप याचा ताळमेळ लागत नाही. उजनीचे ५६ टक्के पाणी वापरास मिळते. त्यातच पुन्हा मराठवाड्याला प्रकल्पाला पाणी दिले गेले. तेव्हा भविष्यात आपणास पाणी मिळेल की नाही याची खात्री देता येत नाही. त्यासाठी कृष्णेचे पाणी उजनीत आणण्याची गरज आहे. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना मी हजार कोटींचा कृष्णा- भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवला. पण त्याला अडकाठी आली. आज हा प्रकल्प १३ हजार कोटींवर गेला आहे. सत्तेत असो िकंवा नसो मी पाण्यासाठी राजकारण केले नाही. माढ्याचा खासदार असलो तरी सोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्नासाठी काम करणार आहे.'
या वेळी चंद्रकांत घोडके, सुभाष पाटील, सुभाष बिराजदार यांनी मनाेगत व्यक्त केले. या मेळाव्याला सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक सतीश पाटील वडकबाळकर माजी सभापती डॉ. चनगोंडा हाविनाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बसवराज बगले, विद्यासागर मुलगे, अरविंद तुळशेट्टी, शिवानंद वरशेट्टी, सरपंच अनिता राठोड, रमेश पाटील उपस्थित होते. श्री वरशेट्टी यांनी प्रास्ताविक केले. या शेतकरी मेळाव्याला दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे खासदार वजियसिंह मोहिते यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर गोपाळराव कोरे, सतीश पाटील, चंद्रकांत घोडके, डॉ. चनगोंडा हिवनाळे आदी.
शिरापूरमधून पाणी मिळेल
कृष्णाखोरेचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे म्हणाले, सीना नदीला कालव्याचा दर्जा देणे अडचणीचे आहे. या नदीवर २१ बंधारे आहेत. १६५ किलो मीटर अंतर आहे. त्यामुळे सीना भीमा जोडकालव्यातून शिरापूर उपसा सिंचन योजनेत येईल. त्यातून २०० क्युसेक्स पाणी मिळू शकते, असे नियोजन आहे. शिवाय देगाव जोड कालव्याचेही पाणी मिळणार आहे. उजनी धरणाची स्थिती पाहता यापुढे २८ फेब्रुवारीनंतर धरणातून बाहेर पाणी सोडणे मुश्कील होणार आहे. वडकबाळाच्या बंधाऱ्याची उंची वाढविणेबाबत सर्व्हे झाला आहे.