आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीरेशने आईचा हात कायमचा सोडला...! कारच्या धडकेत मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शनिवारीसायंकाळी चारच्या सुमाराला आई आपल्या सहा वर्षाच्या मुलासह रस्ता ओलांडत होती. त्याच दरम्यान मुलगा आईच्या पाठीमागे होता. पुणेहून हैदराबादकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची जोरदार धडक बसल्यामुळे तो खाली कोसळला. पुढे जाणारी आई मुलाचा अपघात पाहून जोरात ओरडली. उपचाराला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

वीरेश सतीश बंगरगी (वय ६, रा. धोत्रीकरवस्ती, भवानीपेठ) असे मृत मुलाचे नाव आहे. रघोजी ट्रान्सपोर्टजवळ हा अपघात घडला. मुलाचे काका बसवराज यांनी जोडभावी पोलिसात फिर्याद दिली आहे. वीरेशची आई कांचन या वीरेशला घेऊन लाकडे आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. मुख्य महामार्गावर रस्ता ओलांडत असताना आई पुढे गेल्यानंतर काही पाऊलांवर वीरेश चालत होता. त्याला कारने ठोकरले. अपघातात वीरेश कायमचा सोडून गेल्यामुळे त्या रडू लागल्या.

सर्वांचा लाडका
वीरेशएसव्हीसीएस शाळेत बालवाडीत शिकत होता. तो सर्वांचा अत्यंत लाडका होता. वडील सतीश शेंगा कारखान्यात कामाला आहेत. आई कांचन गृहिणी आहे. अमोल नावाचा दोन वर्षाचा भाऊ आहे. वीरेशचा मृतदेह रविवारी सकाळी मिळाल्यानंतर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येतील असे बसवराज बंगरगी यांनी सांगितले.

सीसीटीव्हीफुटजेचा आधार घेणार
टोलनाक्यावरून अपघाताच्या सुमाराला कुठली कार गेली होती का, याचा तपास सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून वाहनाचा शोध घेऊ असे साहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी सांगितले. अपघातस्थळी अथवा काही अंतरावर वाहनांचे काही पार्ट पडले आहेत का याचीही तपासणी केली. परंतु काही सापडले नाही. पण, त्याचा शोध घेऊ असे ते म्हणाले.