आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍हर्च्‍युअल जगातही दिवाळीचा उत्साह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- व्‍हर्च्‍युअल म्हणजे आभासी जग. कायम किंवा जास्तीत जास्त वेळ ऑनलाइन असणारे. इंटरनेटच्या या युगात या आभासी जगात रमलेली अनेकजण उत्साहात दिवाळी साजरी करण्यात रमलेली दिसून आली. ई फराळ पाठविणे, ई क्रॅकर्स फोडणे आणि ई शुभेच्छा देणे सर्वकाही ऑनलाइन राहून सण साजरा करण्याकडे अनेक युवकांचा कल दिसून येतो. यातून पर्यावरण बचावचा संदेशही जातो आणि मनाजोगी दिवाळी साजरीही करता येते.

ई-फटाके
एक झिप फाईल डाऊनलोड केली तर एक छोटे सॉफ्टवेअर डाऊनलोड होते. त्यातील क्रॅकर्सवर क्लिक केले की साऊंडमधून अँटमबॉम्ब फुटल्यासारखाच आवाज येतो. माऊसच्या साह्याने अगरबत्तीद्वारे हे ई फटाके फोडता येतात. त्यातून ई झाड उडविणे, ई फटाक्यांची लड लावणे, ई फुलबाजी पेटविणे आदी विविध
प्रकारे फटाके फोडता येतात.

ई-शुभेच्छा
एसएमएस पाठवून विश करणे हा ई शुभेच्छांचाच प्रकार होय. ऑनलाइन पद्धतीने ई मेल पाठवून अशा शुभेच्छा देता येतात. फेसबुक ही आता प्रचलित झालेली सोशल साईट आहे. बहुतांश जणांच्या मोबाइलमध्ये फेसबुक अँप्लिकेशन असतेच. त्यामुळे 24 तास ऑनलाइन राहून आपले स्टेटस सतत अपडेट
ठेवणारी ई मंडळी दिसून येतील.

ई-मिठाई
दिवाळीतील विविध खाद्यपदार्थ तयार होते. पण, प्रत्यक्ष हे खाद्यपदार्थ ऑनलाइन पाठविणे शक्यच नाही. म्हणून या फराळांची म्हणजे चकली, करंजी, लाडू, मोतीचूर यांचेच मनोवेधक असे छायाचित्र पाठवून दिवाळी विश करतात. यालाच ई स्वीट किंवा ई फराळ म्हणतात. प्रत्यक्ष फराळापेक्षा असे छायाचित्र डाऊनलोड करणे म्हणजे ई फराळ करणे.