आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vishakapattanam Krula Express Runs On Every Wends Day And Saturday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विशाखापट्टणम्- कुर्ला बुधवारी, शनिवारी धावणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मध्य रेल्वे सोलापूर विभागामधून आठवड्यातून दोन दिवस धावणारी विशाखापट्टणम् -लोकमान्य टिळक टर्मिनल्स आता दर बुधवारी, शनिवारी 11 सप्टेंबरपासून धावणार आहे. या गाडीचा क्रमांक 22819 असा होता. तो आता 18519 असा असेल. गाडी क्रमांक 22820 या लोकमान्य टिळक टर्मिनल्स गाडीचा क्रमांक बदलून 18520 असा राहणार आहे. ही गाडी आता शुक्रवारी व सोमवारी धावणार आहे.

गाडी क्रमांक 17206/17205 काकिनाडा -साईनगर शिडी एक्स्प्रेसचे 4 ऑगस्टपासून डब्बे वाढवण्यात आले आहेत. या गाडीस आता 21 डबे जोडलेले असतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

गुलबर्गा रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोन दुरुस्तीसाठी 45 दिवस 10 ऑगस्टपासून बंद ठेवला जाणार आहे. अन्य फलाटांवरून रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.