आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष्णुपंत कोठे यांनी केली प्रणिती शिंदेंची पाठराखण, म्हणाले, उद्यानाची जागा देण्यास विरोधच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मार्कंडेय उद्यान सुशोभीकरणासाठी बीओटी तत्त्वावर देण्यावरून महापालिका सभागृह नेते महेश कोठे आणि आमदार प्रणिती शिंदे या दोघांनी परस्परविरोधी भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्तेचे सर्वेसर्वा विष्णुपंत (तात्या) कोठे यांना गुरुवारी पत्रकार परिषदेत विचारले असता त्यांनी प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेची पाठराखण करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे म्हणाले, ‘महापालिका स्थायी समिती सभेत सभासदांकडून प्रस्ताव आणून जागा लाटण्याचा प्रयत्न होत आहे. असे होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. यापुढे जागांचा विषय, प्रस्ताव आणू नका असा ठराव करण्याची सूचना करणार आहे. यामुळे जागा वाटपास कायमचा प्रतिबंध बसेल. जागेची निकड सार्वजनिक कामासाठी असेल तरच सभागृहात विषय यावेत, अशी माझी भूमिका आहे.’

जागा देण्यात आम्हाला रस नाही
मार्कंडेय उद्यानाची जागा देण्यास होणारा विरोध आणि जनभावना पाहता ती जागा खासगी व्यक्तीस देऊ नये. जागा देण्यास माझाही विरोधच आहे. जागा घेणारी व्यक्ती महेश कोठे यांच्या प्रभागात आहे, पण ती जागा देण्यात आम्हाला रस नाही.’’ विष्णुपंत कोठे, ज्येष्ठ नेते