आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठ्ठल मंदिरात दोन महिला पुजारी नियुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेसाठी निवडलेल्या दहा पुजात दोन महिलांचाही समावेश आहे. एक आॅगस्टपासून नवनियुक्त पुजारी नित्य पूजाकार्यास प्रारंभ करतील. मंदिर समितीने शुक्रवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. पुजाना दरमहा सहा हजार रुपये मानधन मिळणार आहे. उर्मिला अविनाश भाटे व हेमा नंदकुमार आष्टेकर या महिला पुजाकडे श्री रुक्मिणीमातेची पूजा, अभिषेक व पोशाखाची जबाबदारी राहणार आहे. 27 जुलैपासून त्यांचे कामकाज सुरू होणार आहे.