आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उभारला जातोय बारा हजार चौरस फुटांचा मंडप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी ह. दे. प्रशालेच्या मैदानावर आयोजिलेल्या विवेकानंद साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संमेलनाच्यानिमित्ताने स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा जागर होणार आहे, असे विवेकानंद साहित्य संमेलनाचे सहसमन्वयक प्रा. सुनील कुलकर्णी यांनी सांगितले.

तब्बल बारा हजार चौरस फुटांचा मुख्य सभामंडप उभारण्यात येत आहे. या मुख्य सभामंडपाला श्रीरामकृष्ण सभामंडप तर परिसराला विवेकानंदपुरम हे नाव देण्यात येत आहे. एक हजार 800 चौरस फूट क्षेत्रातील चित्रप्रदर्शनाला जे. जे. गुडवीन यांचे नाव देण्यात येणार आहे. भोजन कक्ष, स्वागत कक्ष, संमेलनासाठी येणार्‍या सुमारे पाचशे जणांची निवास व्यवस्था ह. दे. प्रशालेत करण्यात येत आहे. रेल्वे,बसस्थानकावर स्वागत कक्ष असेल.

विवेकानंद केंद्र उभारणार 42 वर्षांचे माहितीचे फलक
संमेलन परिसराच्या प्रवेशद्वारातच विवेकानंद केंद्राच्या निर्मितीमागची संकल्पना, केंद्राची उभारणी आणि केंद्राकडून गेल्या 42 वर्षांपासून सुरू असलेल्या कार्याची माहिती देणारे डिजिटल फलक लावण्यात येणार आहेत.

संमेलनात सहभागी होण्यासाठी..
विविध परिसंवाद व सत्रांसह सायंकाळी विवेकानंदांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होईल. संमेलनात प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी vsammelan13@gmail.com किंवा 9422649239 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोहलींच्या पुस्तकाचे आकर्षण
स्वामी विवेकानंदांच्या हयातीत त्यांचे चरित्र लिहणारे आणि त्यांचे वाड्मय अनुवादित करणारे गणेश वामन गोगटे यांचे नाव ग्रंथ प्रदर्शन कक्षाला असेल. अमेय प्रकाशन, भारतीय विचार साधना, रामकृष्ण मठ, सुविद्या प्रकाशन, विजय प्रकाशन अशा संस्थांच्या पुस्तक विक्रीचे 20 स्टॉलही उभारण्यात येत आहेत. शिवाय विवेकानंद केंद्राची मराठी, हिंदी, इंग्रजी प्रकाशनांची पुस्तके, नरेंद्र कोहली यांची पुस्तके उपलब्ध राहतील.