आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vivekanand Sahitya Sammelan Organised In Solapur On Novemeber

सोलापुरात नोव्हेंबर महिन्यात होणार विवेकानंद साहित्य संमेलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सोलापुरात विवेकानंद साहित्य संमेलन होणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्यावर होणारे हे भारतातील पहिलेच संमेलन आहे. हिंदी साहित्यातील प्रख्यात लेखक नरेंद्र कोहली (दिल्ली) यांची साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

या संमेलनासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून सुमारे दीड हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. विविध परिसंवाद व सत्रांमध्ये संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, राष्ट्रीय विचारांचे साक्षेपी अभ्यासक व लेखक तरुण विजय, स्वामी बुद्धानंद, अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यासह अनेक मान्यवर लेखक व विचारवंत सहभागी होतील. शेगाव येथील र्शी गजानन महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त शिवशंकर पाटील हे स्वामी विवेकानंद सार्धशती समारोह समिती, महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष आहेत. सोलापुरातील उद्योजक ए. जी. पाटील यांची संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आहेत. संमेलनात सहभागी होण्यासाठी 9422649239 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र कोहली यांचा परिचय
नरेंद्र कोहली हे हिंदीतील साहित्यिक आहेत. आधुनिक हिंदी साहित्यावरील त्यांच्या प्रभावामुळे हिंदी साहित्यात 1975 नंतरचा काळ हा ‘कोहली युग’ म्हणून ओळखला जातो. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित ‘तोडो कारा तोडो’ ही ग्रंथ मालिका लिहिली. कोणत्याही भाषेत विवेकानंदांवर निर्माण झालेल्या साहित्यकृतींमध्ये ही सर्वर्शेष्ठ साहित्यकृती मानली जाते. 1970 ते 2006 या 36 वर्षात 78 पुस्तके लिहिण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे.