आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवेकानंद केंद्रातर्फे तरुणांसाठी नेतृत्व शिबिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- विवेकानंद केंद्राच्या वतीने महाविद्यालयीन तरुणांसाठी 1 ते 4 जून कालावधीत प्रांतस्तरीय नेतृत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वरजवळील (जि. नाशिक) पिंपळद प्रशिक्षण केंद्रात शिबिर होणार असल्याची माहिती समन्वयक आनंद भंडारे यांनी दिली.
महाविद्यालयीन तरुणांमध्ये आत्मविश्वास जागवून नेतृत्त्व गुण विकसित करण्यासाठी विविध सत्रे असतील. संघटन क्षेत्रात दीर्घकाळ अनुभव असणारे प्रशिक्षक शिबिरात असतील. विवेकानंदांचे शक्तिदायी विचार, योग, सूर्य नमस्कार, गट चर्चा, क्रीडायोग, विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद अशी सत्रे शिबिरात आहेत. व्यवस्थापन शास्त्रातील बारकावे, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद साधण्याची कला या विषयांवर भर देण्यात येणार आहे. 28 मेपूर्वी र्शीराम जोशी (8793282256), आनंद भंडारे (9763439001) यांच्याशी पूर्वनोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

केंद्राच्या वतीने ‘घडा आणि घडवा’ हे ब्रीद घेऊन महाविद्यालयीन तरुणांसाठी उपक्रम राबवण्यात येतात. तरुणांना केंद्राचे व्यासपीठ मिळते. केंद्राच्या स्थानिक शाखेच्या माध्यमातून पुढील तीन वर्षे नेतृत्व विकासाच्या दृष्टीने शास्त्रशुद्ध मार्गदर्शन, कन्याकुमारी येथे प्रशिक्षण देण्याची योजना असते, अशी माहिती देवगिरी विभाग संघटक धनंजय सूर्यवंशी यांनी दिली.