आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांनो, यादीत आपले नाव तपासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- 16 व्या लोकसभा निवडणुकीची प्रशासनस्तरावर तयारी सुरू झाली आहे. 31 जानेवारी रोजी मतदार यादीचे अंतिम प्रसिद्धीकरण झाले आहे. मतदारयादीमध्ये नाव, छायाचित्र आपलेच आहे किंवा नाही, याची खात्री करावी. यादीत नाव नसल्यास संबंधित तहसील कार्यालय अथवा निवडणूक कार्यालयात तत्काळ नाव नोंदणी अर्ज भरून पुराव्यासह सादर करावेत.

जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाची यादी अधिकाधिक निदरेष करण्याचा प्रयत्न निरंतर चालू आहे. निवडणूक कार्यालयाने मतदार यादी पुनर्निरीक्षणाची मोहीम राबवून दुबार नावे वगळली आहेत. आपल्या कुटुंबातील व्यक्तींची नावे यादीमध्ये आहेत का, याची खात्री करावी. शिवाय ज्यांना 18 वष्रे पूर्ण झाली आहेत, त्यांनी नव्याने नाव नोंदणी करावी. मताधिकाराचा हक्क बजावण्यास सज्ज राहावे. शिवाय मोहीम राबवण्याच्या कालावधीत परगावी गेलेल्या व्यक्तींनीही मतदारयादी तपासावी, असे आवाहन निवडणूक अधिकारी डॉ. गेडाम यांनी केले

प्रत्येक मतदाराने नावाची एकदा खात्री करावी
मतदार यादीचे अंतिम प्रसिद्धीकरण करण्यात आले आहे. दोन वेळेस पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबवून दुबार नावे डिलिट करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदारांनी यादीमध्ये आपले नावे आहे का याची खात्री करावी. 18 वष्रे पूर्ण झालेल्या तरुणांनी नावे नोंदणी करून मताधिकार बजावावा. आपल्या परिचितांना यासाठी प्रेरित करावे. हक्क बजावण्यासाठी सज्ज राहावे. डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी.

नववधूंची नोंदणी करा..
नवीन मतदारांचे यादीमध्ये नाव नोंदवण्याचे काम सुरू आहे. सध्या विवाह सोहळे सुरू आहेत. आपल्या घरी आलेल्या नववधूचीही नोंदणी करावी. जेणेकरून नववधूही मतदान करण्यापासून वंचित राहणार नाही. यासंदर्भात गावपातळीवर संबंधित गाव कामगार तलाठी यांच्याशी संपर्क साधावा.