आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार नोंदणीला मोठी गर्दी, आता कसोटी अर्ज छाननीची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नागरिकांनीमतदार यादीत नोंदणी करावी, असे प्रशासनाने आवाहन केले खरे, परंतु प्रत्यक्ष नोंदणीसाठीच्या शेवटच्या दिवशी उसळलेली गर्दी लक्षात घेऊन आवश्यक तेवढे कर्मचारी यंत्रणा दिल्यामुळे नागरिकांना तासन् तास रांगेत ताटकळत थांबावे लागले. दुपारनंतर तर उत्तर तहसील कार्यालयात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. आता खरी परीक्षा दाखल अर्जांची वेळेत छाननी करून मतदारयादीत नावे समाविष्ट करणे ही आहे.

उत्तर तहसीलमध्ये शहर मध्य शहर उत्तर तर दक्षिण तहसीलमध्ये दक्षिण सोलापूर मतदारसंघातून नोंदणी अर्ज घेण्यात आले. येत्या विधानसभा निवडणुकीत मताधिकारासाठी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी शेवटचा दिवस होता. नेहमीप्रमाणे भावी मतदारांनी शेवटच्या दिवशी गर्दी करून प्रशासनाची भांबेरी उडवली. लोकसभा निवडणुकीवेळी अनेकांची नावे मतदारयादीत नसल्याचा अनेकांना अनुभव आला. त्यामुळे नागरिकांनी यादीत नावे नोंदवण्याची काळजी घेतल्याचे दिसून आले.

सकाळी ११ वाजता दक्षिण तहसील कार्यालयात नोंदणी अर्ज संपल्याने नागरिकांची भली मोठी रांग दिसून आली. दुपारी १२ नंतर अर्ज उपलब्ध झाल्यानंतर नोंदणी सुरू करण्यात आली. नागरिकांची गर्दी अधिक असल्याने १२ कर्मचऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सायंकाळी वाजेपर्यंत अर्ज स्वीकृती सुरूच होती.

उत्तर तहसीलमध्ये अर्ज स्वीकारण्यासाठी प्रत्यक्षात दोन खिडक्या करण्यात आल्या होत्या. मात्र अर्जदारांची संख्या मोठी असल्याने अनेकांना रांगेत थांबावे लागले. अर्ज दाखल करण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांबरोबरच वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांची संख्या मोठी होती. अनेकजण रांगेत थांबून अर्ज दाखल करीत होते. अर्जदारांची गर्दी वाढल्याने गोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांचा बंदोबस्त मागवण्या आला होता.

मतदार मान्यतेची प्रक्रिया
*तहसीलकार्यालयाकडे दाखल झालेल्या अर्जांची बीएलओकडून छाननी
*अर्जातील नमूद पत्त्याची करावी लागते चौकशी
*चौकशीनंतर अर्ज तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांकडून होतो मंजूर
*डेटा एंट्री करून नाव मतदार यादीत होते समाविष्ट
*एका दिवसातहजार ६४६ अर्ज
*दक्षिणसोलापूर : हजार २६६
*शहरमध्य : हजार ९००
*शहरउत्तर ४७५
बुधवारी उत्तर तहसील कार्यालयासमोर मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अशी तोबा गर्दी झाली होती.
कर्मचारी वाढवले
उत्तरतहसीलमधील गोंधळाची वार्ता जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्यापर्यंत पोहचताच त्यांनी तत्काळ अर्ज स्वीकारण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती पोलिस बंदोबस्त लावण्याची सूचना केली. दुपारनंतर दक्षिण तहसील उत्तर तहसील कार्यालयात अर्ज स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली.

असेही भावी मतदार
मतदारनोंदणीच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात अनेक नवमतदार नाव नोंदणीसाठी आले होते. मतदार नोंदणी अर्ज कोठे मिळणार, अर्ज कसा भरायचा, कागदपत्रे कोणती जोडायची, कोठे अर्ज द्यायचा आदी माहिती विचारत असल्याचे दिसून आले. या गडबडीत काही दलाल मोफत मिळालेले नोंदणी अर्ज १० रुपयांस विकत असल्याचे दिसून आले.