आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voter Registration, Latest News In Divya Marathi

जिल्ह्यात एकाही केंद्रावर मतदार नोंदणी सुरू नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी निमित्त जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रात मतदार यादीचे प्रसिद्धीकरण करावे, बूथ लेव्हल ऑफिसरच्या (बीएलओ) माध्यमातून मतदार नोंदणी करावी, यासाठी 9 जून ते 15 जुलै कालावधीत कार्यक्रम आखून दिला. मात्र, प्रत्यक्षात बीएलओंचे प्रशिक्षण व साहित्य वाटपाच्या नावाखाली अद्याप एकाही केंद्रावर मतदार नोंदणी सुरू केली नाही. नियुक्त बीएलओंना अद्याप आदेशच पोहचले नाहीत. 10 जून रोजी बीएलओंना प्रशिक्षण देऊन साहित्य वाटप करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, संबंधित मतदान केंद्रात एकही कर्मचारी दिसला नाही.
प्रसिद्धी नाही अन् नोंदणीही
मतदान केंद्रनिहाय 9 जूनपासून प्रारूप मतदार यादीचे प्रसिद्धीकरण करण्यात येईल. मतदार नोंदणी करण्यात येणार असल्याचे निवडणूक कार्यालयाने कळवले. मात्र, 11 जून रोजी शहरातील काही मतदान केंद्रनिहाय पाहणी केली असताना एकाही ठिकाणी कर्मचारी आढळले नाहीत वा नोंदणी अर्ज उपलब्ध नाहीत. याबाबत संबंधित कार्यालयांशी संपर्क साधला असता कर्मचार्‍यांना साहित्याचे वाटप सुरू असल्याचे सांगण्यात आले.