आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार नोंदणी मोहिमेत 70 हजारांची वाढ; उद्यापासून मतदार नोंदणी मोहीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 9 जून ते 30 जून कालावधीतील मतदार नोंदणी मोहिमेत 70 हजार 603 मतदारांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील मतदार संख्या 31 लाख 69 हजार 940 पर्यंत पोहचली आहे. यामध्ये 16 लाख 71 हजार पुरुष मतदार तर 14 लाख 98 हजार 810 महिला मतदारांचा समावेश आहे. 1 ऑगस्ट ते विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत राबवण्यात येणार्‍या मतदार नोंदणीमध्ये आणखी काही मतदारांची वाढ होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 30 लाख 99 हजार 337 मतदार होते. यात 16 लाख 34 हजार 857 पुरुष तर 14 लाख 64 हजार 480 महिला मतदारांचा समावेश होता. आगामी विधानसभा निवडणूक पाहता निवडणूक कार्यालयाने जून महिन्यात मतदार नोंदणी मोहीम राबवली.
उद्यापासून मतदार नोंदणी मोहीम
विधानसभा निवडणुकीसाठी 1 ऑगस्टपासून मतदार संघात नाव नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे. ज्या मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत, त्यांनी तहसीलमध्ये नोंदणी करावी. ही मोहीम विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवट दिवसापर्यंत सुरू असेल. अर्ज, वय, रहिवास पुरावा व दोन फोटो आवश्यक आहे. नोंदणी मोहिमेतील मतदारांची नावे अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे यांनी सांगितले.