आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मतदार बना’ मोहिमेतून नावनोंदणीची घ्या संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- 16 व्या लोकसभेसाठी मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये ज्यांचे नाव नाही, ज्यांनी मतदार नोंदणी केली नाही, अशा मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी रविवार दि. 9 मार्च ही शेवटची संधी आहे. जिल्ह्यात 3 हजार 290 मतदान केंद्रे व प्रत्येक तहसील कार्यालयात नावनोंदणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या नोंदणीनंतर आठच दिवसांमध्ये प्रत्येकांना निवडणूक ओळखपत्र मिळणार आहे.
16 व्या लोकसभेसाठी आचारसंहितेचा अंमल सुरू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी गेली दोन दिवस माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी यांना निवडणूक कालावधीत काम करण्याविषयी प्रशिक्षण देत आहेत. महसूल प्रशासनास निवडणूक आयोगानेच 15 टक्के मतदान वाढीचे उद्दिष्ट दिल्याने यंदा मतदान वाढीसाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (दि. 9) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 3 हजार 290 मतदान केंद्रांवर मतदान नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याशिवाय तहसील कार्यालय, प्रत्येक पोलीस ठाणे याठिकाणीही मतदान नोंदणीसाठी अर्ज क्रमांक 6 उपलब्ध राहणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे यांनी दिली.