आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीव्हीपी’च्या विद्यार्थ्यांनी बनवली बाइक-बायसिकल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-पायडलिंगद्वारे वीजनिर्मिती करू शकणारी सायकल पाहिली आहे काय व्हीव्हीपीमधील विद्यार्थ्यांनी ती बनवली आहे. या तंत्राचे पेटंट मिळवण्याची तयारी सुरू आहे.
प्रतीश दळवी, मयूर निकम, अजित अवताडे, आनंद अष्टगी या बी. ई.तील विद्यार्थ्यांनी प्रा. एस. एन. उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्ण केला.
२८ हजार रुपये खर्च आला. मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यास तो कमी होईल. केवळ १० ते १४ हजारात सायकल उपलब्ध होऊ शकेल. दळवी म्हणाला की, अल्टरनेटर, बॅटरी, मोटार हब वापरून ती बनवली आहे. शून्य खर्चात ही सायकल अमर्याद अंतर कापेल. ईमोदी बाइक-बायसिकल असे नाव दिले आहे. १२ व्होल्टच्या चार बॅटऱ्यांतून हब मोटार बसवलेले चाक अॅ क्सलेटरद्वारे फिरेल. या बॅटरीला चार्ज करण्यासाठी ४८ व्होल्टचा वीजनिर्मिती अल्टरनेटर बसवला आहे. अल्टरनेटरला बेअरिंग बसवले गेल्याने पायडल स्मूथपणे फिरते. यातून थेट हब मोटार फिरेल असे तंत्र आहे. यामुळे पायडल मारून थेट मोटार फिरू शकते. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर ६० किमी अंतरापर्यंत सायकल जाते. अल्टरनेटरद्वारे एक तासात बॅटरी चार्ज होते. ती घरातही चार्ज करता येते. अल्टरनेटरद्वारे थेट सायकलला वेग देता येईल. ही सायकल म्हणजे शून्य इंधन खर्चाची जणू बाइकच.

सोरेगाव येथील व्हीव्हीपी अभियांत्रिकीतील विद्यार्थी प्रतीश दळवी, मयूर निकम, अजित आवताडे, आनंद अष्टगी हे "ई मोदी बाइक बायसिकल' समवेत वालचंद महाविद्यालयातील विचार तंत्र प्रदर्शन स्पर्धेत सहभागी झाले होते.

उद्योजकांकडूनही विचारणा
वालचंदमहाविद्यालयाच्या तंत्र स्पर्धेत ही बाइक बायसिकल उतरवण्यात आली. यावेळी प्रदर्शनास भेट देणाऱ्या काही उद्योजकांनी याच्या उत्पादनासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. ही सायकल व्यावसायिकदृष्टीनेही व्यवहार्य ठरल्यास या विद्यार्थ्यांना करिअरचे मोठे दालन निश्चित उपलब्ध होईल.