आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौराणिक प्रेमकथेचा सार आत्मसात करूयात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या वृक्षाची मनोभावे पूजा करतात. त्या निमित्ताने अनेक सुवासिनी पती-पत्नीतील मधुर नाते आणखी दृढ करतात. पूजेसाठी आवश्यक असणारे वडाचे वृक्ष जर नसतील तर वडाच्या फांदीवर सुवासिनी सण उरकतात. तसे न करता वडाच्या झाडाचे संवर्धन करायला हवे. पौराणिक प्रेमकथेचा भावार्थ लक्षात घेणे गरजेचे आहे. येत्या रविवारी वट पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. त्यावेळी वटवृक्षाचीच पूजा केली जावी.

असे आहे वडाचे महत्त्व

वडाचे झाड दीर्घायुष्यी असते. अनेक पिढय़ा हे झाड पाहील इतके ते दीर्घायुष्यी असते. त्याचे वृक्षात रूपांतर होण्यासाठी अनेक वर्षे जातात. त्याच्या पारंब्या व चीकाचा उत्तम औषध म्हणून उपयोग होतो. ऑक्सिजनचे प्रमाण अधिक देते. सत्यवानाचा प्राण गेला तेव्हा सावित्रीने त्याला वडाच्या वृक्षाखालीच ठेवले. त्यातूनही तिने आपल्या पतीवर आलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी शास़्त्राचा आधार घेतला होता. जेव्हा कोणत्याही लॅबची सोय नव्हती, मग आताच्या आधुनिक सावित्रींनी केवळ आपल्या आनंदासाठी बोन्साय केलेले वडाचे झाड न आणता वडाच्या झाडाचीच पूजा करावी.

सात्विकतेला द्या महत्त्व
वडाची पूजा करणे हाच उद्देश असेल तर ती पूजा तशीच व्हायला हवी. वृक्षसंवर्धन हे महत्त्वाचे आहे. वड अनुवंशदर्शक वृक्ष आहे. निसर्गाच्या सान्निध्यात पूजा करावी अथवा ते जमले नाही तर त्या चित्राची पूजा केली तरी चालेल. परंतु वृक्षतोड करणार्‍यांकडून फांदी विकत घेऊन केलेली पूजा करण्याचे प्रकार टाळावेत.’’
मोहन दाते, पंचांगकर्ते

या निमित्ताने घडेल वृक्ष संवर्धन
वडाची पूजा करता येत नाही म्हणून महिला फांदी विकत आणून पूजा करतात. 10 लाख लोकसंख्येच्या शहरात किमान दहा हजार महिला वडाच्या फांदीची पूजा करतात. तसे करण्याऐवजी एक दिवस घराच्या बाहेर पडून वृक्षाची पूजा केली तर फांद्या तोडायचा प्रश्न मिटेल आणि त्यामुळे निसर्ग वाचेल आणि संतुलन ढळणार नाही.