आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडार समाजाची दिंडी पंढरपूरकडे रवाना, 80 बैलगाड्यांचा सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - बाळीवेस येथील वडार समाजबांधवांच्या वतीने माघ वारीनिमित्त काढण्यात येणार्‍या बैलगाडी दिंडी रविवारी रात्री वडार गल्ली येथून पंढरपूरकडे रवाना झाली.1916 पासून बैलगाडी दिंडीची परंपरा सुरू आहे. आजच्या 21 शतकातही दळणवळणाची अद्ययावत साधने उपलब्ध असताना समाजबांधवांनी ही वैशिष्ट्यपूर्ण प्रथा महत्प्रयासाने जोपासण्याचे काम केले आहे.

असे होतात मुक्काम
(वै.) गुरुवर्य लक्ष्मण धोत्रे महाराज यांनी वारीची सुरू केली. कुटुंबीयांसमवेत बैलगाडीतून निघतात. पहिला मुक्काम कोंडी गावात, दुसरा सीना नदी पुलाजवळ, तिसरा मोहोळ, चौथा नारायण चिंचोली, पाचवा पोखरापूर व शेवटचा मुक्काम चंद्रभागा नदीच्या पात्रात असतो. असा एकंदर सात दिवसांचा हा सोहळा असतो.काही समाजबांधवांच्या स्वत:च्या बैलगाड्या आहेत तर काहींकडे नाहीत. समाजबांधव महिन्याआधीपासून खेडोपाडी जाऊन भाडे तत्त्वावर गाड्य ठरवतात. आठ दिवसांच्या या वारीसाठी बैलगाडी व दोन बैलांसाठी किमान चार ते पाच हजार हजार रुपये मोजावे लागतात. यंदाच्या वर्षी जवळपास 80 बैलगाड्यांची दिंडी आहे.

महाराजांचे कार्य महान
लक्ष्मण महाराजांचे समाजाप्रती व धार्मिकतेचे कार्य महान आहे. बैलगाडीने माघवारी करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. ती आजही अखंडितपणे सुरू आहे व राहणार यात शंका नाही. हा वारसा आम्ही असाच पुढे चालू ठेवू. राजाभाऊ कलकेरी, जिल्हाध्यक्ष, मी वडार महाराष्ट्राचा संस्था